Monday, August 31, 2026
BusinessLatest News

भारतातील घनकचरा समस्या सोडवणे हे एक सामूहिक आव्हान – गायत्री दिवेचा, प्रमुख- गुड अँड ग्रीन, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड अँड असोसिएट कंपनीज

मुंबई : भारत  आपल्या प्रचंड मोठ्या कचऱ्याच्या समस्येचे ऊर्जाअर्थव्यवस्था आणि  सक्षमीकरणाच्या इंजिनमध्ये  रूपांतर करू  शकतो. कल्पना करा की रोजच्या दिवसाला  ,५०० कचऱ्याच्या गाड्यांची रांग चालत  आहे आणि त्यातून दरवर्षी आपण  वापरलेला५० दशलक्ष टन घनकचरा जमा होत आहेआपण जे फेकतो ते आपल्या देशभरातली ,१५० डंपसाइट्सच्या विस्तारणाऱ्या समुद्रात जमा होतेआपल्या भूमीवरचा तो डाग आहेपण हे थांबलेले नाहीयात भरच पडत आहेकारण २०३० पर्यंत ही संख्या तिप्पट होण्याचा अंदाज असून वार्षिक १६५ दशलक्ष टन कचरा वाढेलहा कचरा ठेवण्यासाठी आपल्याला अशा लँडफिलची, जमिनीची गरज भासू शकते जी आपल्या स्वप्नांचे अनमोल शहर असलेल्या मुंबईच्या विस्तीर्ण आकाराची असेलकचऱ्याच्या एक भयंकर शहरामध्येच् रूपांतर होईल.

कचर्याबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार

भारतातील केवळ शहरी आणि औद्योगिक सेंद्रिय कचऱ्यामध्येच अंदाजे ,६९० मेगावॅट ऊर्जा इतकी प्रचंड क्षमता आहेक्षणभर त्याची कल्पना कराही अशी शक्ती आहे जी संपूर्ण वर्षासाठी ,५०० हून अधिक घरांच्या उर्जेची सर्व गरज पूर्ण करू शकते आणि हे सर्व आपण जे टाकून, फेकून दिलेले आहे त्यातून होऊ शकते.परंतु हे फायदे केवळ पर्यावरणीय नाहीतआपला कचरा ही आर्थिकदृष्ट्या सोन्याची खाणही  बनू शकतेपुनर्वापर उद्योगाद्वारे कचरा व्यवस्थापनाकडे बघण्याचा एक गंभीरनाविन्यपूर्ण दृष्टीकोन दरवर्षी ३०,०००  कोटी रुपयांचा खजिना खुला करू शकतोकचऱ्याकडे फेकून देण्याची टाकाऊ गोष्ट म्हणून पाहण्यापासून  वापरलेल्या संधींचा साठा म्हणून बघण्याची आणि आपला दृष्टीकोन बदलण्याची हीच वेळ आहे.

 आपल्या कचऱ्याचे दायित्व

आपण ज्या कचर्याशी झगडत आहोत त्याच्या साठत चाललेल्या ढिगाऱ्याबाबत चिंतन केले तर हे स्पष्ट होते की आता आपण सर्वांनी पुढे जाण्याची वेळ आली आहेप्रत्येक नागरिकमहामंडळे आणि सरकारी घटकांनी एकमेकांच्या साथीने प्रयत्न केले पाहिजेत आणि या समस्येचा निकराने सामना केला पाहिजे.

गोदरेजमध्येआम्ही स्थानिक नगरपालिका आणि नागरिकांशी सहयोग करून अनेक सामुदायिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केले आहेतआमचे सर्वांगीण धोरण तीनपदरी आहे – लँडफिल्समधून कचरा वळवणेएक शाश्वत कचरा व्यवस्थापन व्यवसाय मॉडेल स्थापित करणे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव करणे.

तंत्रज्ञानाच्या शक्तीचा उपयोग करून आम्ही पालिकेच्या कचरा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि जबाबदारी आणली आहेआता,कंत्राटदारशहरी स्थानिक संस्था अधिकारी आणि पर्यवेक्षक कचऱ्याच्या उत्पत्तीपासून शेवटपर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेऊ शकतात आणि दररोज प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याच्या सेवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करू शकतातया स्पष्ट दृष्टीकोनामुळे  जलद समस्या सोडवण्याची खात्री मिळते, नागरिकांना त्यांच्या कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि पुनर्वापराच्या शक्यतांचे दरवाजे खुले होतात.

आमच्या सार्वजनिकखाजगी लोकसहभागाच्या मॉडेलला यश मिळाले आहे२०१६ मधील आमच्या  सुरुवातीच्या  पथदर्शी  प्रकल्पापासून आम्ही १३,००० टन घनकचरा लँडफिल्समधून यशस्वीरित्या वळवला आहेया उपक्रमाने वैज्ञानिक कचरा व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन दिलेकचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांचे प्रबोधन केले आणि स्वच्छता कामगारांना सुरक्षा आणि सन्मान प्रदान केला.कचरा व्यवस्थापन पूर्णपणे स्वीकारण्यासाठी आणि त्याच्या अंतर्भूत संधींचा फायदा घेण्यासाठी आपण या त्रिस्तरीय सहभाग मॉडेलचा स्वीकार केला पाहिजेकचरा विलगीकरणाबद्दल प्रत्येकन प्रत्येक नागरिकाला शिक्षित करण्यासाठी खाजगी क्षेत्र सरकारसोबत सहकार्य करू शकते आणि कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करू शकतेत्याचवेळी स्थानिक अधिकारी मंडळे घराघरात कचरा वेगळा  करण्याच्या आवश्यकतेसाठी  नियमांची अंमलबजावणी करू शकतात.

स्त्रोत वेगळे करणे हा शाश्वत कचरा व्यवस्थापन परिसंस्थेचा अत्यावश्यक पाया आहेविघटनशील आणि नॉनबायोडिग्रेडेबल कचरा वेगळे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कचरा पुनर्वापर संसाधने खर्च केली जातातही समस्या स्त्रोत विलगीकरणाद्वारे सहजतेने सोडवली जातेसमाज आणि स्वच्छता कामगारांचा समावेश असलेली एक सुव्यवस्थित जागरूकता मोहीम हे ध्येय गाठू शकतेनागरिक आणि रहिवासी संघटनांनी वैज्ञानिक कचरा वर्गीकरणसंकलन आणि विल्हेवाटीचा पाया बनू शकेल अशी ही प्रणाली अंतर्गत पातळीवर राबवविणे आवश्यक आहे.

भारतात अंदाजे . दशलक्ष कचरा गोळा करणारे कर्मचारी आहेतसर्व प्रकारच्या पुनर्वापरयोग्य कचऱ्यापैकी ८०कचरा गोळा करणारे हे खरेखुरे हीरो आहेतयापैकी बहुतेक कामगार मोजक्याच संरक्षण आणि सुरक्षिततेसह असंघटितपणे काम करतात. त्यांच्या कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करणे हा सर्वांगीण कचरा व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा पैलू आहेमूलभूत संरक्षणात्मक सुविधा पुरवून त्यांच्या सामाजिकआर्थिक अधिकारांबद्दल जागरूकता वाढवूनत्यांना मूलभूत ओळखपत्रे मिळविण्यासाठी सक्षम करून आणि सरकारी धोरणांमध्ये प्रवेश सुलभ करून आपण आपल्या पुनर्वापर प्रणालीला लक्षणीयरीत्या मजबूत करू शकतो.शेवटीकचऱ्याच्या अफाट विस्ताराचा सामना करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहेपारदर्शकतामजबूत पुनर्वापर प्रणाली स्थापित करणे आणि आपण निर्माण करत असलेला कचरा आणि स्त्रोत वेगळे करण्याचे महत्त्व याबद्दल व्यक्तींना शिक्षित करणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहेआपल्या कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading