Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘लस्ट स्टोरीज 2’चा टीझर आऊट; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज

ओटीटीवर धुमाकूळ घातलेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या अँथॉलॉजी फिल्म सिरीजचा पुढचा भाग ‘लस्ट स्टोरीज 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ते ही नवीन कथा आणि नवीन कलाकारांस. नुकताच ‘लस्ट स्टोरीज 2’ चा टीझर रिलीज झाला आहे. यात काजोल, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर आणि विजय वर्मा यांच्यासह अनेक स्टार्स पहायला मिळत आहेत. नऊ अभिनेते आणि चार दिग्दर्शकांचा समावेश असलेल्या या चित्रपटात प्रेम आणि वासनेच्या अनेक छटा असलेल्या चार नवीन कथा दाखवल्या जाणार आहेत. 

यापूर्वी ‘लस्ट स्टोरीज’ चा पहिला भाग हा २०१८ मध्ये रिलीज झाला होता. यात अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर या चार दिग्दर्शकांची कथा होती. ज्या 2013 मध्ये आलेल्या ‘बॉम्बे टॉकीज’ या अँथॉलॉजी चित्रपटाच्या संकल्पनेवर आधारित होत्या. यामध्ये राधिका आपटे, भूमी पेडणेकर, मनीषा कोईराला, कियारा अडवाणी आणि आकाश ठोसर, विकी कौशल, नेहा धुपिया यांच्यासह अनेक स्टार्स होते. 

लस्ट स्टोरीजचा पहिला भाग पाहिल्यानंतर दुसऱ्या भागात हे दिग्गज कलाकार अन् दिग्दर्शक काय घेवून येणार आहेत याबद्दल उत्सुकता आहे. येत्या 29 जून ला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर हा रिलीज होत आहे.   

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading