fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

राजामौलीच बॉक्स ऑफिसचा ‘बाहुबली’, ‘RRR’ने पहिल्याच दिवशी तोडले सर्व रेकॉर्ड

‘बाहुबली 2’ नंतर एस. एस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. काल (25 मार्च) हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. अन् या चित्रपटाने आजपर्यंतचे भारतीय चित्रपटाचे सगळे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 223 कोटी इतकी कमाई केली आहे. त्यामुळे लेखक, दिग्दर्शक एस. एस राजामौलीच बॉक्स ऑफिसचा ‘बाहुबली’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाने एस.एस राजामौली यांच्याच ‘बाहुबली 2’ या चित्रपटाच्या पहिल्याच दिवसांच्या कामाईलाही मागे सारले आहे. आरआरआर (RRR) या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे वर्ल्ड वाइड ग्रॉस बॉक्स ऑफिस कॉलेकशन हे 223 कोटी इतके आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करीत ही माहिती दिली आहे.

या चित्रपटात ज्युनियर एन. टी. रामा राव, राम चरण, आलिया भट्ट, आजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचे बजेट जवळपास पाचशे 50 कोटी रुपये इतके असून याने पहिल्याच दिवशी दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading