fbpx

तीन दिवसात पाणीपुरवठा सुधारला नाही तर आम्ही आंदोलन करू – खासदार गिरीश बापट


पुणे : आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठकी पार पडली.  त्या बैठकीला खासदार गिरीश बापट यांनी हजेरी लावली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सभात्याग करून मी बाहेर पडलो आहे. गेल्या दोन तीन दिवस पुणेकरांना पाणी मिळत नाहीये. ही प्रशासनाची चूक आहे. मी समजू शकतो उन्हाळा आहे. शहराला समान पाणी पुरवठा झाला पाहिजे. तीन दिवसात पाणीपुरवठा सुधारला नाही तर आम्ही आंदोलन करू त्याच नेतृत्व मी करणार, असा इशारा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकाराशी बोलताना दिला. 

गिरीश बापट म्हणाले, उद्या 4 वाजता आयुक्तांच्या घरी मी जाणार आहे. आयुक्तांना 3 ते 8 पाणी येत आहे. उद्या आयुक्तांच्या घरी जाणार आहे कमी दाबाने पाणी येत आहे की नाही ते बघणार आहे, असेही गिरीश बापट म्हणाले.

लोकप्रतिनिधी मुळे पाण्याची समस्या होत आहे. असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यावर गिरीश बापट म्हणाले, असं पहिल्यांदाच घडत आहेत. आधी असं होत नव्हतं. काही दबावतंत्र सुरू आहे.
शहराला समान पाणी पुरवठा का होत नाही हे. मी तपासणार आहे. आमचे नगरसेवक पण तपासणार टँकर लॉबी सक्रिय आहे, असा मला संशय आहे, असे खासदार गिरीश बापट म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: