Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

‘आयोडिन मॅन’ डॉ. चंद्रकांत पांडव यांच्या संशोधनामुळे जगात भारताची मान उंचावली – डॉ. अविनाश भोंडवे

वनराई संस्थेच्या वतीने पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव यांचा गौरव

पुणे : आयोडीनयुक्त मिठाचा वापर केला नाही, तर त्याचे दुष्परिणाम मेंदूवरही होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात याचे सेवन योग्य प्रमाणात झाले पाहिजे. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांवर डॉ. चंद्रकांत पांडव यांनी संशोधन केले. देशाविदेशात त्यांच्या या कामाची दखल घेतली गेली. डॉ. पांडव यांच्या संशोधनामुळे आतापर्यंत अनेक देशांना फायदा झाला आहे. त्यामुळे जगामध्ये भारताची मान उंचावली गेली असल्याची भावना डॉ. अविनाश भोंडे यांनी व्यक्त केली.

‘आयोडिनमॅन’ म्हणून ओळख असलेले आणि नुकताच पद्मश्री किताब मिळालेले डॉ. चंद्रकांत पांडव यांचा सत्कार समारंभ वनराई संस्थेने आयोजित केला होता. यावेळी वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, पंडीत वसंतराव गाडगीळ, विश्वस्त धन्यकुमार चोरडीया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारत साबळे, प्रास्ताविक अमित वाडेकर यांनी केले तर आभार मुकुंद शिंदे यांनी मानले.

डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, कुशाग्र बुद्धीच्या जोरावर डॉ. चंद्रकांत पांडव यांनी शिक्षणात प्रगती करीत ग्रामिण भागापासून सुरुवात करत दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेपर्यंत (एम्स) मजल मजल मारली. प्राथमिक शिक्षण मराठी शाळेत झालेल्या या माणसाने ‘एम्स’मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि चार दशके तिथे अध्ययन, अध्यापन आणि वैद्यकीय सेवा केली. केवळ वैद्यकीय सेवा करत न थांबता त्यांनी पुढे संशोधनाला सुरुवात केली आणि त्यात यशस्वी झाले हि अभिमानाची बाब आहे.

डॉ. पांडव म्हणाले की, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी वनराईची स्थापना ज्या उद्देशाने केली ते सफल होताना दिसत आहे त्यामुळे माझ्या दृष्टीने डॉ. धारिया हे ‘भारतरत्न’च आहेत. अशी भावना डॉ. पांडव यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

जीना इसी का नाम है!” या गाण्यावर पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव यांनी ठेका धरला

वैद्यकीय क्षेत्रात संगीत चिकित्सेला महत्त्व आहे. संगीत आणि शरीरस्वास्थ याचा परस्पर संबंध आहे. संगीत मन शांत करतो, मनाला प्रसन्न करतो. आजच्या काळामध्ये ताणतणावाचे निवारण करण्यासाठी संगीताला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संगीताची महती सांगत त्याचा प्रत्यय उपस्थितांना जाणून देण्यासाठी त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेशवंदना ऐकवली तर कार्यक्रमाच्या शेवटी “जीना इसी का नाम है!” या गाण्यावर ठेका धरत वातावरण निर्मिती केली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading