Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

ग्रामीण पोलीस दलातील कर्मचा-यांच्या कुटुंबियांसाठी जाधवर ग्रुपतर्फे अभिनव योजना  

पुणे : कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर फाऊंडेशन संचलित न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या वतीने ग्रामीण पोलीस दलात काम करणा-या पोलीस कर्मचा-यांच्या कुटुंबातील सदस्यांना सवलतीच्या दरात शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक आणि जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स यांच्यामध्ये अधिकृत करार करण्यात आला असल्याची माहिती जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, पोलिसांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून पोलिसांच्या मुलांना शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात येईल. पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या ज्या शाखेत शिक्षण घ्यायचे आहे, तेथे केवळ ५० टक्के शुल्क भरुन प्रवेश घेता येणार आहे.

जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या ८० शाखा आहेत त्यामध्ये २५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. प्लेग्रुप ते दहावीपर्यंत शाळा, आर्ट्स कॉमर्स सायन्स जुनियर कॉलेज, सीनियर कॉलेज, इंजीनियरिंग डिग्री डिप्लोमा कॉलेज, बी.एड अँड डी. एड कॉलेज, एमबीए मॅनेजमेंट कॉलेज, नर्सिंग आणि पॅरामेडिकल कॉलेज आदींच्या शाखेमध्ये ५०% सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.  इन्स्टिट्यूटचे मानाजी नगर न-हे धायरी येथे २, वडगाव बुद्रुक, आंबेगाव, भोर, उस्मानाबाद असे सहा कॅम्पस आहेत. यापैकी कोणत्याही ठिकाणी प्रवेश घेता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading