‘परांजपे अथश्री’ द्वारे होणार खोपोली येथील ‘रमाधाम’ वृद्धाश्रमाचे संयुक्त व्यवस्थापन

पुणे  : आयुष्यातील चढ उतार अडचणी, आव्हाने यशस्वीपणे पार केलेल्या जेष्ठ नागरिकांना एक समाधानी शांत आयुष्य जगता यावं या उद्देशाने शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व. मिनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांमधून खोपोलीमध्ये निर्मित ‘रमाधाम वृध्दाश्रमाची व्यवस्था आता पुणेस्थित परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ यांच्या संयुक्त नियोजनाने पाहिली जाणार आहे, अशी माहिती श्रीमती रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी दिली.

‘रमाधाम’च्या नव्या वास्तूचा पुनर्विकास व लोकार्पण सोहळा नुकताच दुरप्रणाली पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि चंदूमामा वैदय तसेच संस्थेचे विश्वस्त व मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मिनाताई ठाकरे अशी दोन सहृदयी, खंबीर आणि दूरदृष्टी असणारी माणसं जेव्हा एखादा प्रकल्प हाती घ्यायचा ठरवतात, तेव्हा तो प्रकल्पही तितकाच खास आणि मोठा असतो. असाच एक प्रकल्प म्हणजे ‘रमाधाम’ जेष्ठ नागरिकांना त्यांच्या घरासारखी, आपली हक्काची व सुरक्षित वाटावी अशी जागा, त्यांच्याच वयाचे व समविचारी मित्र मैत्रिणी, निसर्गरम्य परिसर, शुद्ध, स्वच्छ व निसर्गरम्य वातावरण देण्याच्या उद्देशाने श्रीमती रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेच्या वतीने १९९० साली रमाधाम वृध्दाश्रमाची खोपोली येथे स्थापना झाली. आज रमाधामची नवीन व भव्य वास्तू उभारली गेली असून जेष्ठ नागरिकांसाठी एक अत्याधुनिक व सुसज्ज व्यवस्था तिथे उपलब्ध आहे. रमाधामचे व्यवस्थापन आता पुणेस्थित परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.

रमाधाम विषयी अधिक माहिती साठी https://www.ramadham.com या संकेतस्थळाला भेट दयावी किंवा पूनम कांबळे:- ७७६९९११७२२ / किरण शिंदे – ९८२२१९९९७७ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

%d bloggers like this: