अजित पवारांच्या मुलाचा ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व मानले जातात. अनेकदा आपल्या राजकीय विधानांमुळे ते सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण सध्या त्यांची चर्चा एका वेगळ्याच कारणाने होताना दिसतेय. शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

जय पवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये उर्वशी आणि जय यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. तिघेही कॅमेऱ्याला पोझ देताना दिसत आहे. उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे? जय उर्वशीला डेट तर करत नाही ना? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र हे दोघे केवळ एका शो निमित्ताने एकत्र आले असल्याचं म्हटलं जातंय.

Leave a Reply

%d bloggers like this: