Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

वन दिन विशेष- डोलवी-कारावमध्ये डोलताहेत २६ हजार वृक्ष !

पुणे : रायगडमधील पेण तालुक्यातील डोंगरावरील खुल्या वनजमिनीचे घनदाट हिरव्या वनात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र वन विभाग आणि जे एस डब्ल्यू स्टील (डोलवी)यांच्यासमवेत पुण्यातील तेर पॉलिसी सेंटर या स्वयंसेवी संस्थेने हाती घेतलेल्या दशलक्ष वृक्ष लागवड कार्यक्रमामुळे २६ हजार वृक्षांची वनराई तयार झाली आहे. २०१७-२०१८ मध्ये त्रिपक्षीय सहकार्य करार अंतर्गत सुरु झालेल्या या प्रकल्पातील झाडे आता २० फूट उंच झाली आहेत.

तेर पॉलिसी सेंटर, जेएसडब्ल्यू स्टील्स आणि वनखात्याने वृक्षारोपणासाठी डोलवी आणि करव येथील वनजमिनीची दोन ठिकाणे परस्पर सहमतीने निवडली होती. या वनीकरणाच्या जागा जेएसडब्लू स्टील प्लांटच्या जवळ आणि मुंबई-गोवा महामार्गाला लागून आहेत. वनीकरणाच्या दोन्ही जागा अत्यंत उंच आणि पोहचण्यास कठीण आहेत.

डोलवी येथील वनीकरण जागेचे साइटचे क्षेत्र सुमारे 28 हेक्टर आहे.टेकडीभोवती अनेक दशकांपासून वेगवेगळ्या जमाती राहत आहेत. बहुतेक डोंगराळ भागात विशेषत: पावसाळ्यात मोसमी वनस्पती असतात, परंतु उन्हाळ्यात, टेकडी पूर्णपणे नापीक असते.

या प्रदेशात दरवर्षी सुमारे २२०० मिमी २५०० मिमी पाऊस पडतो. कारण हे ठिकाण कोकणात वसलेले आहे आणि ते किनारपट्टीच्या अगदी जवळ आहे. पावसाळ्यात तीव्र उतार आणि कोणत्याही नैसर्गिक किंवा कृत्रिम अडथळा नसल्यामुळे वाहून जाणारे पाणी समुद्राच्या पाण्यात सहज मिसळते. त्यामुळे येथे निर्माण झालेली वृक्ष लागवड नैसर्गिक अडथळे म्हणून काम करेल, जमिनीची धूप कमी करेल आणि भूजल पातळी वाढेल. पाण्याची टंचाई या पातळीवर सोडवली जाऊ शकते, या हेतूने हे वृक्षरोपण केले.

स्थानिक प्रजातींची वृक्ष लागवड :

काराव ही वनीकरणाची जागा डोलवीपासून 2 किमी अंतरावर वसलेली आहे .त्यामुळे तेथील भौगोलिक हवामान समान आहे. काराव साइटचे एकूण वृक्ष लागवड क्षेत्र 11 हेक्टर आहे.दोन्ही ठिकाणे आरक्षित वनक्षेत्राला लागून आहेत. बेसलाइन आणि ग्रीड लाइन सर्वेक्षण यासारख्या वैज्ञानिक पद्धतींच्या मदतीने डोलवी ( 22.220) आणि काराव (4335) या दोन्ही ठिकाणी एकूण 26,555 देशी झाडे लावण्यात आली आहेत. कदंब, कडुनिंब, करंज,जांभूळ, ताम्हण, वड, पिपळ, महोगणी, जंगली बदाम, सिंगापूर चेरी आणि स्पॅनिश चेरी यासह विशेषतः जंगलातील झाडे लावली आहेत. सेंद्रिय खते आणि मातीने भरलेल्या 18 18-इंच पिशवीत 12-15 फूट सरासरी उंची असलेली झाडे सुमारे 30 महिने जुनी आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading