fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsSports

35 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेला सुरुवात

पुणे : कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लाल मातीतल्या कबड्डी चा आवाज पुन्हा जोमाने घुमू लागला आहे श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट संयुक्त कानिफनाथ मित्र मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव 2022 निमित्त 35 किलो वजनी गटातील दोन दिवसीय भव्य कबड्डी स्पर्धेला आज सुरुवात झाली. सदरील स्पर्धा या पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात येत आहेत.

याचे उद्घाटन पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन उपकार्याध्यक्ष अण्णा देशमुख, माजी राष्ट्रीय खेळाडू सुरेश राऊत, मिरा शेळके, श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दिपक निकम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी सार्वजनिक गणेश उत्सव अध्यक्ष सचिन पवार,सुनील तेलंग, योगेश सुपेकर, अमित मापारे, गणेश सुपेकर, गणेश शेलार, दिनेश पेंढारे आदी उपस्थित होते.

कोरोणाच्या पार्श्वभूमीमुळे लहान मुले मैदानी खेळा पासून वंचित होते. मुले तासंतास मोबाईल मधे गुंतून राहायची. लहानपणीच मैदानी खेळाचे महत्व पटावं. खेळांविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या कबड्डी स्पर्धांचे आयोजन केल्याचं दीपक निकम यांनी सांगितले.

कबड्डी स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला आकर्षक बक्षिसे असल्यामुळे ती मिळवण्यासाठी या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळाडूंची चढाओढ लागणार आहे. शहराच्या विविध भागातून 26 संघ सहभागी झाले आहेत. सदरील स्पर्धा ही पूरग्रस्त वसाहत मैदान, एरंडवणे, पुणे येथे सुरू आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading