‘काश्मीर फाईल्स’मध्ये अर्धसत्य, उद्धव ठाकरे यांचे एका ‘बाणा’त दोन निशाने
मुंबई : काश्मिरी पंडितांवर काश्मीर खोऱ्यात अन्याय झाला ही वस्तू स्थिती आहे. तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीर पंडितांसाठी आवाज उठवला होता. त्यावेळी भाजपचे समर्थन असलेले व्ही. पी. सिंग यांचे सरकार सत्तेत होते. तेव्हा भाजपने काश्मीर पंडितांसाठी काहीच केले नाही. पण आता त्या घटनेचा राजकारांनासाठी भाजप वापर करत आहे. त्यावर आधारीत काश्मीर फाइल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे त्यात अर्धसत्य दाखवण्यात आले आहे. दोन्ही बाजू दाखवणे गरजेच होत, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बाणात दोन निशाने साधले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदूत्वाचा केवळ राजकारांसाठी उपयोग करणार शिवसेनेच हिंदूत्व नाही. चित्रपटाच्या माध्यमातून जी फाईल उघडली आहे त्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू आणि मुस्लिमांवर अत्याचार झाला. त्यावेळी सरकार भाजपाने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचं होतं. त्यांना आपण विरोध केला होता. कारण त्यांनी पंतप्रधान झाल्यावर कोणत्याही मंदिरात नाही तर दिल्लीतील जामा मशिदीत जाऊन शाही इमामला भेटून आले होते. त्यावेळी भाजपाने एकही अवाक्षर काढले नव्हते. एकच आवाज तेव्हा जो होता तो बाळासाहेब ठाकरेंचा होता. पण आता अश्रू ढाळत असलेल्या एकानेही ब्र काढला नव्हता.
पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपाचं हिंदुत्व थोतांड आहे हे जनतेला दाखवण्याची गरज आहे. वाजपेयींनीच भारत-पाकिस्तान बससेवा सुरु केली होती. त्यावेळीही यावरुन टीका झाली होती. इथपासून ते नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी, हे सर्वांनी पाहिले आहेत. पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होतं हे पाहिलं आहे. आम्ही पाकिस्तान जनता पार्टी, हिजबूल जनता पक्षही म्हणू शकतो. तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणार असाल तर आम्ही कमरेचं सोडणार नाही पण तुमचं उघडं पडलेलं जनतेला दाखवून देऊ,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
