संत तुकाराम हे संतापेक्षा जास्त शास्रज्ञ, समाजसुधारक होते – चंद्रकांत कुलकर्णी

पुणे : ” संत तुकाराम यांनी अंधश्रद्धेवर कोरडा ओढला. प्रपंचात राहून त्यांनी परमार्थ साधला. ते द्रष्ट्ये होते, क्रांतिकारी होते. त्यांनी प्रबोधनाचे मोठे काम केले. ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नाही हे त्यांनी सांगितले. संत तुकाराम हे संतापेक्षा जास्त शास्रज्ञ,समाजसुधारक होते.”

एका माणसाचं संत तुकाराम होणं हे जास्त महत्वाचे आहे. संत तुकाराम हे
जन्माला आले त्यावेळी ते संत नव्हते. तुमच्या आमच्या सारखेच होते. उच्च मध्यम वर्गीय कुटुंबात ते जन्मले होते. त्यांचे वडील सावकार होते. मात्र नंतरच्या आयुष्याच्या प्रवासात त्यांनी जे पाहिले,अनुभवले, जगले, त्यातून ते कवी, समाजसुधारक बनले. ते स्वतः माणूसपणाचा चमत्कार होते, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

तुकाराम बीजेचे औचित्य साधत, बेलवलकर सांस्कृतिक मंच या संस्थेचे अजित व समीर बेलवलकर यांच्या पुढाकाराने आणि राजेश दामले यांच्या संकल्पनेतून जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे अभंग व गाथा यावर आधारित ‘तुका आकाशा एव्हढा’ या विशेष सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमातील दुसऱ्या कार्यक्रमांतर्गत रविवारी २० मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) येथे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संत तुकाराम’ हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यानंतर मुलाखतकार राजेश दामले यांनी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी संबंधित विषयावर संवाद साधला. याप्रसंगी बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे अजित व समीर बेलवलकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: