Wednesday, October 7, 2026
Latest NewsSports

एस. बालन करंडक – माणिकचंद ऑक्सिरीच, गेमचेंजर्स इलेव्हन संघांची विजयी सलामी !!

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत माणिकचंद ऑक्सिरीच आणि गेमचेंजर्स इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून  विजयी सलामी दिली.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत अक्षय जाधव याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर माणिकचंद ऑक्सिरीच संघाने विझार्डस् इलेव्हन संघाचा ४६ धावांंनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना माणिकचंद ऑक्सिरीच संघाने २० षटकात ८ गडी गमावून १४२ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये दिलीप मालविया याने ५९ धावांची तर, अविनाश शिंदे याने ४६ धावांची खेळी केली. या आव्हानासमोर विझार्डस् इलेव्हनचा डाव ९६ धावांवर संपुष्टात आला. अक्षय जाधव याने २० धावांमध्ये ६ गडी बाद करून विझार्डस्ची फलंदाजी मोडून काढली.

शुभम रांजणे याच्या अष्टपैलू खेळीमुळे गेमचेंजर्स इलेव्हन संघाने पुनित बालन ग्रुप संघाचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुप संघाने २० षटकात १८९ धावा धावफलकावर लावल्या. मेहूल पटेल याने ६२ चेंडूत ७ चौकार व ८ षटकारांसह ११६ धावांची खेळी करून स्पर्धेत पहिले शतक नोंदविले. हे आव्हान गेमचेंजर्स इलेव्हन संघाने १८.५ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. शुभम रांजणे याच्या ५२ धावा आणि युवराज प्रदीप याच्या ५९ धावांच्या जोरावर संघाने ही धावसंख्या सहज पूर्ण केली.

स्पर्धेचे सविस्तर निकालः 
१) माणिकचंद ऑक्सिरीचः २० षटकात ८ गडी बाद १४२ धावा (दिलीप मालविया ५९ (४७, ६ चौकार, १ षटकार), अविनाश शिंदे ४६, संतोष सांगळे ३-२९, प्रशांत गजारे २-२०) वि.वि. विझार्डस् इलेव्हनः १८ षटकात १० गडी बाद ९६ धावा (संतोष सांगळे २६, आदित्य गजभिये १४, अक्षय जाधव ६-२०); सामनावीरः अक्षय जाधव;

२) पुनित बालन ग्रुपः २० षटकात ७ गडी बाद १८९ धावा (मेहूल पटेल ११६ (६२, ७ चौकार, ८ षटकार), ऋतुराज वीरकर ३४, शुभम रांजणे २-३८) पराभूत वि. गेमचेंजर्स इलेव्हनः १८.५ षटकात ५ गडी बाद १९० धावा (शुभम रांजणे ५२ (२७, ५ चौकार, ३ षटकार), युवराज प्रदीप ५९ (३६, २ चौकार, ५ षटकार), निखील जोशी नाबाद २३, उमर शहा २-३७); सामनावीरः शुभम रांजणे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading