गोखले कंस्ट्रक्शन्सतर्फे नवरात्रातील भव्य गृहमहोत्सवाचे आयोजन
महोत्सवाचे सलग १४ वे वर्ष; घरखरेदीदारांसाठी यंदा ९, १८, २७ टक्के सवलत ठरणार विशेष पर्वणी
पुणे : पुणे शहरातील मोक्याच्या ठिकाणी दर्जेदार निवासी व व्यापारी संकुलांची निर्मिती करण्यात नावलौकिक असलेल्या गोखले कंस्ट्रक्शन्सने यंदाच्या नवरात्रातील आपल्या भव्य प्रॉपर्टी फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. सदर महोत्सवाचे हे सलग १४ वे वर्ष असून, शहरातील प्रमुख ठिकाणी साकारणाऱ्या विविध गृहप्रकल्पांचे पर्याय व आर्थिक दृष्ट्या अत्यंत लाभदायक अशा योजना यामुळे सदर फेस्टिवल नेहमीच घर किंवा ऑफिस घेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
याविषयी माहिती देताना गोखले कंस्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले म्हणाले, “शहराच्या विविध भागांमध्ये साकारत असलेल्या आमच्या गृहप्रकल्पांमध्ये सदनिका घेतल्यास या सीझनमध्ये घरखरेदीदारांसाठी सदनिकेच्या किमतीवर तब्बल ९, १८ व २७ टक्के सवलत मिळवण्याची संधी उपलब्ध असेल.”
गोखले म्हणाले, “गेली १३ वर्षे ग्राहकांनी आमच्या नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावर्षी ११ ते २० ऑक्टोबर या नवरात्राच्या काळात घरखरेदीदारांना मयूर कॉलनी, कर्वे नगर, सहकार नगर, प्रभात रोड, करिष्मा चौक – कोथरूड, डीपी रोड कोथरूड, सीटी प्राईड जवळ कोथरूड या ठिकाणी साकारात असलेल्या भव्य व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असणाऱ्या निवासी प्रकल्पांच्या माध्यमातून २ बीएचके ते ६.५ बीएचकेच्या स्काय व्हिला पर्यंतचे पर्याय घरखरेदीदारांसाठी उपलब्ध असतील व या सदनिकांच्या किमती अंदाजे रुपये १.६ कोटी पासून पुढे असतील.”
नजीकच्या भविष्यात गोखले कंस्ट्रक्शन्सतर्फे बाणेर, बावधन, औंध, हिंजवडी व बोट क्लब रोड येथे प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत. त्याविषयीची माहिती देखील यंदाच्या नवरात्रातील भव्य गृहमहोत्सवादरम्यान ग्राहकांना मिळू शकेल. उत्तम सदनिकांबरोबरच सिटी प्राईड कोथरूड समोरील आलिशान व्यापारी संकुल असलेल्या गोखले बिझनेस बे मध्ये प्री लीज असलेल्या व थेट विक्रीसाठी उपलब्ध असलेले ऑफिसचे पर्याय देखील यंदाच्या नवरात्राचे विशेष आकर्षण असेल, असे विशाल गोखले यांनी सांगितले.
सदर फेस्टिवल गोखले हाउस, आयकर कार्यालयाजवळ, प्रभात रस्ता, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचा भाग असलेले प्रकल्प रेरा नोंदणीकृत आहेत.
