टर्टलमिंट फिनटेक सोल्यूशन्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 19 जून 2026 रोजी खुली होणार
मुंबई : टर्टलमिंट फिनटेक सोल्यूशन्स लिमिटेड (“कंपनी”) आपल्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) ची बोली/ऑफर 19 जून 2026 रोजी सुरु करणार आहे.
प्रति इक्विटी शेअरसाठी 144 रुपये ते 152 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
बोली किमान 98 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 98 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
प्रती शेअर 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्री ऑफरमध्ये 6,607.22 दशलक्ष रु. (660.72 कोटी रु.) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या 14,601,846 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे.
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक गुरूवार 18 जून 2026 आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 19 जून 2026 रोजी खुली होईल आणि मंगळवार, 23 जून 2026 रोजी बंद होईल.
इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE बरोबर एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेफ्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायर्स लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (आरएचपी) मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.
ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(2) च्या नियमनात आहे. SEBI ICDR नियमांनुसार नियम 32(2) च्या अंतर्गत ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. (यास “अँकर गुंतवणूकदार हिस्सा” असे संबोधले जाईल). यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी. परंतु त्यासाठी अशी अट आहे की देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स (प्रमुख गुंतवणूकदार भाग वगळून) नेट QIB Portion मध्ये (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. जर नेट ऑफरच्या किमान 75% चे वाटप QIBs ला करता आले नाही, तर संपूर्ण अर्ज रक्कम तत्काळ परत केली जाईल. पुढे, नेट ऑफर पैकी 15% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Investors” किंवा “NIIs”) (म्हणजे “Non-Institutional Portion”) उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग 0.2 दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1 दशलक्ष रु. पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. बिगर-संस्थात्मक भागाच्या या दोन उप-श्रेणींपैकी कोणत्याही एका उप-श्रेणीत कमी सदस्यता (under-subscription) राहिल्यास, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार त्या न वापरलेल्या हिस्स्याचे वाटप बिगर-संस्थात्मक हिस्स्याच्या दुसऱ्या उप-श्रेणीतील बोलीदारांना केले जाऊ शकते. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. प्रत्येक बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदाराला करण्यात येणारे वाटप किमान अर्ज आकारापेक्षा कमी असणार नाही. हे वाटप बिगर-संस्थात्मक भागांत उपलब्ध असलेल्या इक्विटी समभागांच्या उपलब्धतेच्या अधीन असेल. त्यानंतर उपलब्ध राहणारे उर्वरित इक्विटी समभाग असल्यास सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार अनुसूची XIII मध्ये यासंदर्भात नमूद केलेल्या अटींनुसार प्रमाणानुसार (proportionate basis) वाटप केले जातील. सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (“Retail Individual Investors” किंवा RIIs) (“Retail Portion”) 10% पेक्षा अधिक नसलेला भाग वाटपासाठी उपलब्ध असेल. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.
प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.
