पोलीस पीडित मुलीला की बलात्कार करणार्‍या आरोपीला मदत करत आहेत? चित्रा वाघ यांचा सवाल

पुणे : शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करणारे पीडित महिला आज पुण्यात आली आहे. त्यावर त्या मुलीचा मला पहिला फोन आला होता तिने मला सांगितले मी गोव्यातल्या कोलवा गावात आहे. तिला इंजेक्शन देऊन गावातल्या कोलवा गावात ठेवले होते जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिला समजले पण नाही की आपण कुठे आहोत.

मी त्या गावातल्या लोकांची संपर्क साधला तेव्हा आम्हाला समजले की पीडित मुलगी गोव्यात आहे. मी लगेच त्या गावातल्या पोलिसांशी संपर्क साधला व त्यांना सांगितले की स्थानिक पोलिस प्रशासनाकडे तिला ताब्यात द्या ,. तिने मला सांगितले मला कुठले तरी इंजेक्शन दिले आहे .व कुठल्यातरी पेपर वर सह्या घेतल्या आहेत .मी लगेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिता मोरे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना ही घटना कळवली. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्या मुलीला नक्की कुठले इंजेक्शन दिले. तिच्या कोणत्या पेपरवर सह्या घेतल्या. ती मुलगी पुण्यात आली तरी पोलिसांनी तिची तपासणी का? केली नाही.  पोलीस पीडित मुलीला की बलात्कार करणार्‍या आरोपीला मदत करत आहेत ?असा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

चित्रा वाघ म्हणाल्या, असे प्रश्न का समोर येत आहे.तिने चित्रा वाघ का फोन केला ? त्यासाठी विश्वास हा मिळवावा लागतो. तिने मला का फोन केला. तिने माझ्याकडे मदतीचा हात मागितला.हे आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. तर पुढची पिढी यापासून लांब थांबेल. तिने मला सांगितले म्हणून पोलीस व विरोधी पक्ष मदत करणार नाहीत का ?असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना पुण्यात वडगाव येथे घडली होती. पीडित मुलीवर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, पीडित मुलगी स्वतःच्या खताने शिक्षण शिकत आहे. तिच्यावर ज्या मुलांनी जीवघेणा हल्ला केला ती मुलगी रूबी हॉल क्लिनिक मध्ये ॲडमिट होती तिचे बबिल 2 लाख 75 हजार रुपये. हे प्रशासनाने भरावे.
वडगाव मधील ज्या शाळेत त्या मुलीवर जीवघेणा हल्ला झाला, त्या शाळेतील शिक्षकांवर प्रशासनाने कारवाई करावी. प्रशासनाने त्या मुलीला व्यवस्थित शिकवावे .असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: