राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभाग तर्फे आयोजित चर्चासत्रासाठी इराणचे राजदूत अली चेगेनी व डॉ महौम्मद खाजेनूरी यांना निमंत्रण
पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग व व्यापार विभाग तर्फे आयोजित व्यापार चर्चासत्रासाठी “इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान चे राजदूत ” डॉ अली चेगेनी यांना डॉ महौम्मद खाजेनूरी यांच्या सहकाऱ्यांमुळे आमंत्रित करण्यात आले होते या चर्चासत्रा दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय उद्योग – व्यापारास असणाऱ्या विविध संधी बाबत चर्चा झाली.
या बिझनेस समेटसाठी राष्ट्रवादी उद्योग-व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेशजी फाटे,पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरध्यक्ष .प्रशांत जगताप नगरसेविका नंदा लोणकर, प्रदेश उपाध्यक्ष संदीप जगताप ,शहराध्यक्ष भोलासिंग अरोरा, प्रदेश उपाध्यक्ष केतन सदाफुले , व प्रथिसिथ व्यापारी सुजीतजी पारख , गुर्विँदेरसिंग बिंद्रा, अमर छाबरा, दर्शन चावला, किशन मीलानी, नितेश ग्रोवर, चरंजितसिंग सहानी, मोहित गिरमै, सत्तार सैयद, पुणे व्यापारी महासंघ सचिव महेंद्र पितलिया आदि उपस्थित होते. व्यापारी सेलच्या शहर उपाध्यक्ष प्रीती चड्डा मॅडम आणि प्रदेश सरचिटणीस निलेश अशोक शहा यांनी एका उत्कृष्ट बैठकीचे आयोजन केले .उद्योग व्यापार विभागाच्या माध्यमातून प्रीती चड्डा यांच्या प्रमाणे अनेक शिलेदार पुढे येऊन नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रम हाती घेतील !
