कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महिला वर्गाला प्रेरणा देणारा – रुपाली चाकणकर
पुणे : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांना उद्योगिनी फाउंडेशन तर्फे उद्योगिनी पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. सदरील कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरु सभागृह, घोले रोड पुणे या ठिकाणी नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रुपाली चाकणकर अध्यक्ष महिला आयोग महाराष्ट्र राज्य, स्मिता पाटील युवती प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, उद्योजक बाळासाहेब अमराळे, मनीष घुले, कर्नल प्रकाश पाटील, गायक जितेंद्र भुरुक, उद्योगिनी समूहाच्या पल्लवी वागस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आरोग्य, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या रोहिणी कामठे, डॉ, तृप्ती काळे, सुजाता हांडे, स्नेहा टिळेकर, संध्या अंकुशे, रचना देशमुख, सुहाणी पवार, मयुरी नवगिरे, समृद्धी पाटील, ऋजुता जोशी, चारुलता पाटील, रुपाली देशपांडे, पूनम दिगिकर, ज्योती नायर अशा १४ कर्तृत्ववान महिलांना सन्मानचिन्ह, मेडल आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. उद्योगिनी समूह व स्मार्ट सखी यांच्या वतीने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ऋजुता बहिरट, छाया पांचाळ, शितल अमराळे, सुवर्णा मंडलिक, अर्चना कोरे यांनाही सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना चाकणकर म्हणाल्या की महिलांचं सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. महिलादिन हा एक दिवस साजरा न होता तो ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. उद्योगिनी समूहाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा झालेला सन्मान महिला वर्गाला प्रेरणा देणारा आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना कदम यांनी केले तर आभार पल्लवी वागस्कर यांनी मानले.
