Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर धारदार हत्याराने वार 

पुणे : एकतर्फी प्रेमातून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर धारदार हत्याराने वार केल्याचा धक्कादायक प्रकार आज पुण्यातील वडगावशेरी परिसरात घडला. आज सकाळी शाळेच्या परिसरातच ही घटना घडली. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर विद्यार्थिनी ही दहावीच्या वर्गात शिकत आहे. आज सकाळी ती शाळेत आली असता आरोपीने शाळेत येवून शाळेच्या आवारात या विद्यार्थिनीवर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला. त्यावेळे शाळेच्या आवारात घाबराटीचे वातावरण परसले. दरम्यान, ज्या आरोपीने या विद्यार्थिनीवर वार केले आहेत, तो या विद्यार्थिनीच्या परिचयाचा असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading