स्वारगेट ते काशिंग गाव कमान व चिंचवड गाव ते खांबोली (कातरखडक) असे दोन नवीन बसमार्ग सुरू
पुणे : पीएमपीएमएल कडून दिनांक ११/०३/२०२२ पासून मार्ग क्रमांक २३१ – स्वारगेट ते काशिंग गाव कमान व मार्ग क्रमांक ३१६ – चिंचवड गाव ते खांबोली (कातरखडक) असे दोन नवीन बस मार्ग सुरू करण्यात आले. पीएमपीएमएलचे संचालक पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या हस्ते या दोन्ही नवीन बसमार्गांचे उदघाटन करण्यात आले. स्वारगेट ते काशिंग गाव कमान या बसमार्गाचे हाडशी येथे तर चिंचवड गाव ते खांबोली (कातरखडक) या बसमार्गाचे शेळकेवाडी येथे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी जि. प. सदस्य शंकर मांडेकर, माजी जि. प. सदस्य शांताराम इंगवले, मुळशीचे माजी पंचायत समिती सभापती रविंद्र कंधारे, पीएमपीएमएलचे नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, स्वारगेट डेपो मॅनेजर विकास मते यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या या दोन्ही मार्गावर प्रत्येकी एक बस धावणार असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गांवर बसेस वाढविल्या जातील.
मार्ग क्रमांक २३१ – स्वारगेट ते काशिंग गाव कमान बस मार्ग = स्वारगेट, डेक्कन कॉर्नर, कोथरूड डेपो, चांदणी चौक, भुकुम, पिरंगुट, पौड, कोळवण, काशिंग गाव कमान असा असणार आहे.
मार्ग क्रमांक ३१६ – चिंचवड गाव ते खांबोली (कातरखडक) बस मार्ग = चिंचवड गाव, डांगे चौक, हिंजवडी माण फेज ३, रिहे फाटा, खांबोली (कातरखडक) असा असणार आहे.
प्रकाश ढोरे यांनी स्वखर्चातून दिले विद्यार्थ्यांना बसपास
आसबे गावातील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलचे संचालक प्रकाश ढोरे यांनी स्वखर्चातून बस प्रवासासाठी पास दिले. गरजू विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची पर्वणीच ठरली. स्वामी विवेकानंद विद्यालयात विद्यार्थी पास वितरणाचा कार्यक्रम प्रकाश ढोरे यांच्या हस्ते पार पडला. सदरच्या उदघाटन व पास वितरण समारंभास मुळशी तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो- संग्रही
