Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

ॲड. स्वप्ना खामकर पिंगळे यांची भाजपा कायदा आघाडीच्या सेक्रेटरी पदी निवड

मंचर: मंचर येथील जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी भाजपा महिला कार्यकर्त्यां ॲड. स्वप्ना खामकर – पिंगळे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कायदा आघाडीच्या सचिव पदी निवड करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे राज्य महिला सेक्रेटरी वर्षा डहाले, जिल्हा परिषद पुणे सदस्य आशा बुचके, ॲड. धर्मेद्र खांडरे संघटन सरचिटणीस भाजपा, भाजपा आंबेगाव तालुकाध्यक्ष डाँ. ताराचंद्र काराळे, तसेच जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी भाजपा ॲड. संजय सावंत पाटील या सर्वाच्या शुभहस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.

जागतिक महिला दिनानिमित्त मंचर शहरात भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका महिला मोर्चा तर्फे हळदी कुंकू व लकी ड्रॉ तसेच विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, नुकतेच युक्रेन मधुन सुखरुप परत आलेल्या विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला, डाँक्टर महिला, वकील महिला, इंजिनियर महिला, शिक्षक महिला व इतर सर्वच क्षेत्रातील महिला मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला तसेच या कार्यक्रम व्दारे भाजप संघटना बांधनी मोठ्या प्रमाणात करण्यात आली, महिला कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यात आले. पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती आपल्याला बहुमताने जनतेच्या आशिर्वादाने जिंकायचीच अशा विश्वास पदाधिकारीना उपस्थित भाजपा जिल्हा नेतेमंडळी प्रमुख पाहुणे यांनी दिला.

यावेळी कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हा सचिव सुवर्णा जोशी, आंबेगाव तालुका सरचिटणीस संदिप बाणखिले,भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष संजय थोरात, भाजपा मंचर शहर अध्यक्ष नवनाथ थोरात, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, महिला मोर्चा अध्यक्षा आंबेगाव रुपाली घोलप आदी भाजपा जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading