Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

अजित पवारांचा उद्या पुण्यात मॅरेथॉन दौरा

पुणे : महानगर पालिके निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या 13 मार्च रोजी पुण्यात उद्घाटन कार्यक्रमांचा धडाका लावणार आहेत. त्यांच्या हस्ते एक, दोन, तीन नव्हे तर चक्क 29 ठिकाणी उद्घाटनांचा नारळ फुटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध कामांचे लोकार्पण उद्या अजित दादांच्या हस्ते होणार आहे.  सकाळी सातपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे प्रवक्ते प्रदीप देशमुख उपस्थित होते. अजित पवार यांचे उद्या पुण्यातील कार्यक्रम सकाळी 10 वाजता कात्रज डेउरी मधून जाणारा 24 मीटर सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ रस्ता लोकार्पण सोहळा, दुपारी 1.15 विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा 1) पंचशील बुद्ध विहार 2) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन वानवडी, 3)संध्याकाळी 4.10 नूतनीकृत शिल्पाचे लोकार्पण नगरसेवक प्रदीप गायकवाड पंचशील चौक ताडीवाला रोड, ऑक्सीजन पार्क व भूमिपूजन सभा नगरसेवक सुनील टिंगरे खराडी आदी कार्यक्रम होणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading