राजकारण बाजूला ठेवत शरद पवार यांनी घेतला संगीत कार्यक्रमचा आनंद
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना राजकारणा शिवाय सांस्कृतिक, कला आणि इतर क्षेत्राचीही आवड आहे. त्यातच प्रत्यय आज आला. आज देशात महत्वाच्या पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल लागले आहे. त्यात 4 राज्यात भाजप तर एका राज्यात आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे. पण या सर्व राजकीय धामधुमीत राजकारण बाजूला ठेवून शरद पवार यांनी आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच संगीताचा आनंदही घेतला.
रौप्य महोत्सवात पदार्पण केलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे तर्फे ’13वा राम कदम कलागौरव पुरस्कार’ वितरण सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला पवार यांनी एक नव्हे तर 6हुन अधिक गाण्यांचा आनंद घेतला.
यावेळी यंदाचा ’13वा राम कदम कलागौरव पुरस्कार’ ब्रेथलेस गायनासाठी प्रसिद्ध आलेले गायक व संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन आणि कै. वसंतराव देशपांडे यांचा वारसा समृद्ध करणारे युवा शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
फोटो- संग्रही
