राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘वाग्धारा सन्मान’ प्रदान

अभिनेत्री हेमा मालिनी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांना ‘वाग्धारा जीवन गौरव पुरस्कार प्रदान’ करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देशभरातील कर्तृत्ववान व्यक्तींना वाग्धारा नवरत्न, यंग अचिव्हर्स व स्वयं सिद्धा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार हेमा मालिनी, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह व वाग्धाराचे अध्यक्ष डॉ. वागीश सारस्वत उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पंकज प्रसून लिखित ‘लडकिया बडी लडाका होती है’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यपालांच्या हस्ते अभिनेते रघुवीर यादव, पत्रकार सुनील कुमार सिंह, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु रुबी ओझा, साहित्यिक आफताब हसनैन, व्यंगचित्रकार राजेंद्र घोडपकर यांना वाग्धारा नवरत्न सन्मान प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: