Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

प्रभाग रचनेनुसारच आगामी निवडणुका होतील अधिकारी वर्गाचा दावा

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेचा अहवाल आज राज्य निवडणुक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. राज्य निवडणुक आयोगाने यापुर्वी सुचविल्याप्रमाणेच दुरूस्त प्रारुप प्रभाग रचनेवरच हरकती व सूचना मागवून सुनावणी घेण्यात आल्याने प्रभाग रचनेमध्ये फारसे बदल होणार नाहीत.

तसेच ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबल्या तरी हीच प्रभाग रचना अंतिम राहणार असल्याचे सूतोवाच वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले आहेत. दरम्यान, ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किमान सहा महिनेे लांबतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणुका लांबल्यास आता केलेल्या प्रभाग रचनेतही बदल होतील, अशी जोरदार चर्चा राजकिय वर्तुळात आहे.
अधिकार्‍यांनी चर्चेतील या शंकेला छेद दिला आहे. महापालिकेने ६ डिसेंबरलाच प्रारुप प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे दिली होती. मात्र, प्रभाग रचना करताना नैसर्गिक सीमारेषांचे पालन झाले नसल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे आल्यानंतर आयोगानेही या रचनेत २४ बदल सुचविले होते.
महापालिका प्रशासनाने हे बदल केल्यानंतरच आयोगाने त्यावर हरकती व सूचना मागविण्याचे आदेश दिले.
यानंतरही ३५ हजार हरकती आल्या. यापैकी साधारण साडेसात हजारच हरकतदार प्रत्यक्ष सुनावणीच्यावेळी उपस्थित राहीले. यामुळे सुनावणीनंतर दीड ते दोन टक्केच बदल केेल्याची चर्चा अधिकारी वर्तुळात आहे. या सोबतच प्रारुप प्रभाग रचना, त्यावर हरकती सूचना मागवून सुनावणी घेउन अंतिम करण्यात येणार्‍या प्रभाग रचनेनुसारच आगामी निवडणुका होतील, असा दावा अधिकारी वर्गाकडून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading