अहिल्यादेवी शाळेत धाडसी समाजसेविकांचा सत्कार
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त प्रसंगी जीव धोक्यात घालून समाज कार्य करणार्या क्रांत पवार, जया राऊत, अर्चना अभ्यंकर, पायल जिरेसाळ, कल्याणी वैराट, अमृता फासगे, नूतन साबळे या धाडसी महिलांचा सत्कार करण्यात आला. शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, डीईएसच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर, अड राजश्री ठकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मतदानाचा अधिकार, महत्त्व, मतदान करण्यासाठी लागणारी प्रगल्भता, वैचारिक बैठक, संवेदनशीलता याबाबत डॉ. साठे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. केळकर यांनी जिद्द, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आदींचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका अनघा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती मिश्रा, दीपाली थोरात, चारुता प्रभुदेसाई, मानसी देशपांडे, स्मिता राजगुरू यांनी संयोजन केले.