नवीन मराठी शाळेत महिला दिन साजरा

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत महिला दिनानिमित्त कोरोना काळात शाळा बंद असल्याने अभ्यासात मागे पडणार्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवी वृत्तीने शिकविणार्या माजी शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थिनींनी राष्ट्रमाता आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांल प्रेरणादायी कामगिरी करणार्या महिलांच्या वेशभूषा करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला. आनंदी बोराटे या विद्यार्थिनीने महाराणी ताराबाईचे स्वगत सादर केले. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेली भेटकार्ड आणि गजरे दिले.

शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, डीईएसच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर, माजी नगरसेविका ज्योत्स्ना सरदेशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रुपाली सावंत, सोनाली मुंढे, अर्चना देव, योगिता भावकर, अंतीर शेठ, तनुजा तिकोने, श्रीपाद जोशी, धनंजय तळपे यांनी संयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: