Tuesday, October 6, 2026
Latest NewsPUNE

जागतिक महिला दिनानिमित्त विद्यापीठात परिसंवाद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अल्युमिनाय असोसिएशनचा उपक्रम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अल्युमिनाय असोसिएशनतर्फे जागतिक महिलादिनानिमित्त यंदाच्या आंतरराष्ट्रीय संकल्पनेनुसार ‘पूर्वग्रह तोडताना..’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे.

या परिसंवादाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर या परिसंवादात व्यवस्थापन परिषद सदस्य सुनेत्रताई पवार, आयबीएस च्या संचालक प्रा. ज्योती टिळक, प्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. अंजली क्षीरसागर, आयक्यूएससी च्या संचालक डॉ. सुप्रिया पाटील, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर आदींचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अल्युमिनाय असोसिएशनचे संचालक प्रा. संजय ढोले करणार आहेत तर समन्वयक म्हणून प्रतीक दामा आणि विक्रमादित्य राठोड हे काम पाहणार आहेत, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्राम ढोले करणार आहेत.

महिला दिना दिवशी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात दुपारी ४ वाजता हा परिसंवाद होणार असून याचे थेट प्रक्षेपण एसपीपीयू अल्युमिनाय असोसिएशन च्या यू ट्यूब चॅनेलवर होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading