पुण्यातील डॉ. प्रिती जोशी यांची प्रतिष्ठेच्या ‘फर फेलोशिप फॉर दलाई लामा स्टडीज’साठी निवड

पुणे : पुण्यातील डॉ. प्रिती जोशी यांची प्रतिष्ठेच्या ‘फर फेलोशिप फॉर दलाई लामा स्टडीज’ या फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे. सदर फेलोशिप दिल्ली येथील फौंडेशन फॉर युनिव्हर्सल रीस्पोन्सिबिलीटी ऑफ हीज होलीनेस दलाई लामा या संस्थेतर्फे १४ वे दलाई लामा यांची शिकवण व तत्वज्ञान यासंबंधी संशोधन करण्यासाठी प्रदान करण्यात येते. यामध्ये बहुविद्याशाखीय व नाविन्यपूर्ण दृष्टीकोन वापरण्यावर भर देण्यात येतो.

डॉ. प्रिती जोशी या कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठ येथे लिबरल आर्टस विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या फेलोशिपच्या माध्यमातून १४वे दलाई लामा आणि इतर तत्त्ववेत्ते यांचे तत्वज्ञान आणि शिकवण यांचा सखोल तुलनात्मक अभ्यास करून त्याचा आंतरधर्मीय विविधता, सुसंवाद आणि शांतता राखण्यासाठी अध्यापनशास्त्र या विषयामध्ये कसा उपयोग करता येऊ शकेल यावर संशोधन करण्यावर भर देण्यात येणार आहे. या संशोधन कार्यासाठी रुपये २ लाख इतकी फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: