fbpx

“दिल दिमाग और बत्ती” चित्रपटाचे मल्टिस्टारर पोस्टर प्रदर्शित

२२ एप्रिल रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

सा क्रिएशन्स निर्मित “दिल दिमाग और बत्ती”  या मराठी चित्रपटाचे हटके पोस्टर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. ८० ते ९० च्या दशकातील इस्टमन कलर चित्रटांच्या पोस्टर्सची आठवण करून देणारे आणि तारे तारकांनी भरलेले हे धमाल पोस्टर फारच लक्षवेधी आहे. “आज तक फिल्मों में हमेशा ३ भाई बिछडे थे लेकीन उन में बहन कभी नहीं थी।” अशी टॅगलाईन देऊन सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलेल्या या पोस्टरमुळे रसिकांच्या मनात या  चित्रपटाबद्दल उत्कंठा वाढली आहे.

सा क्रिएशन्स ची पहिलीच निर्मिती असलेल्या “दिल दिमाग और बत्ती” या मराठी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते आहेत. सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात हृषीकेश गुप्ते यांनी लिहिलेल्या गाण्यांना अवधूत गुप्ते यांनी स्वरसाज चढवला आहे तर छायांकन सलील सहस्त्रबुद्धे यांचे आहे.

“दिल दिमाग और बत्ती” २२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: