पुणे महानगरपालिकेचे 8592 कोटीचे अंदाजपत्रक

आयुक्त विक्रमकुमार याच्या कडून स्थायी समितीला सादर

पुणे : महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज पुणे महापालिकेच्या २०२२-२३ चे अंदाजपत्रक सादर केले. तब्बल ८५९२ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले असून, त्यामध्ये ४८८१ कोटीची महसुली कामे तर ३७१० कोटी भांडवली प्रस्तावित केले आहेत. गेल्या वर्षी ७६५० कोटीचे अंदाजपत्रक तयार केले होते. यात यंदा सुमारे हजार कोटीची वाढ केली आहे.

शहरातील वाहतुकीचा प्रश्न विचारात घेऊन आयुक्तांनी विश्रांतवाडी येथे राष्ट्रीय मार्ग योजनेअंतर्गत उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याचप्रमाणे सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर मधील पूल बांधणे , पाषण पंचवटी येथून कोथरूड पर्यंत बोगदा तयार करणे, खराडी बायपास येथे उड्डाण पूल बांधणे, यासह कल्याणी कल्याणीनगर ते कोरेगाव होणाऱ्या पुलाचे काम करणे यासह नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविणे यासाठी 669 कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. पथ विभागासाठी 514 कोटींची भांडवली तरतूद केली आहे. शहरांमध्ये दहा किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक तयार करणे, मध्यवर्ती पेठांमधील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता डांबरीकरण करणे. अर्बन स्ट्रिट प्रोग्राम अंतर्गत पाच रस्त्यांचे नव्याने डिझाईन करण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरात चार नव्याने प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. घनकचरा दलासाठी अंदाजपत्रकात 128 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची शाळा पुन्हा सुरू होणार असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना प्रस्तावित असल्याचे  कुमार यांनी सांगितलं .

या अंदाजपत्रकात प्रकल्पांची संख्या मर्यादित असली तरी उत्पन्न वाढीमध्ये स्थानिक संस्था करातून 330 कोटी, वस्तू व सेवा करातून २१४४ कोटी, मिळकतकरातून 2 हजार 160 कोटी पाणी पट्टीतून 294 कोटी शासकीय अनुदान 512 कोटी कर्जरोख्यांच्या माध्यमातून 500 कोटी बांधकाम परवानगी शुल्कातून 1157 कोटी, पंतप्रधान आवास योजनेतून 200 कोटी असे उत्पन्न अपेक्षित असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. अंदाजपत्रक सादर करताना महापौर मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर उपमहापौर सुनिता वाडेकर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने ,विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, काँग्रेसचे आबा बागुल उपस्थित होत्या.

Leave a Reply

%d bloggers like this: