दिलासादायक : आज सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात एकही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाची तिसरी लाट ओसारली असून कोरोना रुग्ण संख्येतही लक्षणीय घाट झाली आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 65 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 188 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायकबाब म्हणजे आज सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात एकही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.
पुणे शहरात आजपर्यंतची कोरोना रुग्णांची एकूण संख्या 66 लाख 5 हजार 96 इतकी झाली आहे. यापैकी 65 लाख 3 हजार 8 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9345 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 943 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 62 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2778 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
