आतापर्यंत नऊ हजार विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात यश – व्ही मुरलीधरन
पुणे : रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक दिवसांपासून युद्ध सुरू असल्याने भारतीय विद्यार्थी तेथे अडकले आहेत. दूतांशी चर्चा करून आतापर्यंत नऊ हजार विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात यश आले आहे, अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली.
व्ही मुरलीधरन यांनी आज पुण्यात युक्रेनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत बैठक केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुरलीधरन म्हणाले, युक्रेनमध्ये जो संघर्ष चालू या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. काल आम्ही किव्हमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना किव्ह सोडण्यास सांगितले होते. तसेच त्यांना युक्रेनचा पश्चिमेला जाण्यास सांगितले आहे. खारकीव्ह बाबत सुद्धा आम्ही advisory देत आहोत. 1200 विद्यार्थी ट्रेन ने खारकिव्ह मधून बाहेर पडले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना सुरक्षित परत घेऊन येणे, हे भारत सरकारने ठरवले आहे, असे मुरलीधरण म्हणाले.
विद्यार्थ्यांना बाहेर काढायला उशीर झाला असं म्हणता येणार नाही. भारतीयांची माहिती घेण्यास जानेवारीमधेच सुरुवात केली होती. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना युद्धामुळे शिक्षण घेता आले नाही . त्यावर मुरलीधरण म्हणाले ,पालकांनी सांगितले की कॉलेज ऑफलाइन करत नव्हते त्यामुळे विद्यार्थ्यांना युक्रेन सोडता आले नाही. दरम्यान, भारताचे 4 मंत्री वेगळ्या देशात जाऊन समन्वय साधत आहेत, असेही मुरलिधरन यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुरलीधरण म्हणाले, देशात पुणे शहर सर्वात स्वच्छ पाचवं शहर आहे. पुणे मेट्रो मध्ये 98 टक्के जमीन अधिग्रहण झालं आहे. पुण्याची 32 किलोमीटरची मेट्रो 2022 पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन व्ही मुरलीधरण यांनी दिले.
केंद्र सरकारने किती रुपये पुण्याला दिले याची माहिती व्ही मुरलीधरन यांनी दिली. ते म्हणाले,
390 करोड स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्याला देण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड साठी 91 करोड स्मार्ट सिटी अंतर्गत देण्यात आली आहेत. पुणे 104 टक्के गेलं आहे मनरेगामध्ये प्रत्येक 3 महिन्यांनी आढावा घेणार असल्याचे असे मुरलीधरण म्हणाले.
