Thursday, August 13, 2026
Latest NewsMAHARASHTRA

‘NCPA@ThePark’साठी एनसीपीएची बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत भागीदारी

मुंबई : मुंबईची प्रीमिअर कला आणि सांस्कृतिक संस्था नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्‌स (एनसीपीए) ने बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सोबत शहरामध्ये लाईव्ह परफॉर्मन्सेस आणि परफॉर्मिंग आर्ट्‌सला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कला उत्साहींचे थिएटर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करण्यासाठी ‘NCPA@ThePark’ ह्या उपक्रमाची सुरूवात केली आहे.

कूपरेज बॅन्डस्टॅन्ड, फोर्ट, मुंबई येथे 4 मार्च 2022 रोजी आपल्या पहिल्या आवृत्तीची सुरूवात करत NCPA@ThePark मध्ये संगीत, नृत्य आणि कविता अशा क्षेत्रांमधील कार्यक्रमांचा रोमांचक मिलाफ पाहायला मिळेल. मार्चच्या पहिल्या दोन वीकेन्ड्‌सना आयोजित केलेल्या हे कार्यक्रम प्रत्येकी एक तासाचे असतील आणि लोकांसाठी विनामूल्य खुले असतील. सध्याच्या कोविड नियमांनुसार, यात प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

एनसीपीएचे चेअरमन खुशरू एन संतुक म्हणाले, “जागतिक दर्जाची शहरे तिथल्या नागरिकांच्या कला क्षेत्रातील सातत्यपूर्ण सहभागावरून ओळखली जातात. अधिकारीक कार्यालयांच्या मदतीने आणि सीएसएमव्हीएस, पृथ्वी थिएटर, काळा घोडा आर्ट्‌स फेस्टिव्हल इत्यादींसह आमच्या सहयोगाच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी दर्जेदार परफॉर्मन्सेस आयोजित करण्याचा एनसीपीए येथे आमचा प्रयत्न राहिलेला आहे. कडक निर्बंधांमधून नुकतेच मुंबई शहर हळूहळू बाहेर येत असून ह्या उपक्रमासाठी केवळ आमच्या थिएटर्समध्येच परफॉर्मन्सेस पुन्हा सुरू करण्यासाठी नाही तर ते लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी बीएमसीसोबत सहयोग करताना आम्हांला आनंद होत आहे. NCPA@ThePark उपक्रमासह लाईव्ह परफॉर्मन्सेसचा आनंद सर्वत्र पसरवण्याची आम्ही आशा करतो. त्या आनंदाची जागा अन्य काहीच घेऊ शकत नाही.”

ह्या उपक्रमाला आपले समर्थन प्रदान करत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल म्हणाले, “NCPA@ThePark उपक्रमासाठी एनसीपीएसोबत सहकार्य करताना बीएमसीला अतिशय आनंद होत आहे. गेली दोन वर्षे ह्या शहराने कोविडमुळे खूप काही सहन केले आहे. ह्या उपक्रमासह कलात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह आम्ही मुंबईमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न करत आहोत.”

मुंबईच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या “लॉकडाऊनमुळे संपूर्ण परफॉर्मिंग आणि कला क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. आता शहरातील आयुष्य हळूहळू पूर्ववत होत असून शहरातील कला आणि संस्कृतीला समर्थन देण्याचे NCPA@ThePark चे उद्दिष्ट्‌य आहे.”

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading