मॅनेज्ड वर्कस्पेस सेवा पुरवठादार टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड तर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर
बंगळुरू मुख्यालय असलेल्या मॅनेज्ड वर्कस्पेस सोल्यूशन्स सेवा पुरवठादार टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड (टेबल स्पेस) ने प्रस्तावित आयपीओसाठी आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सेबीकडे दाखल केला आहे.
डीआरएचपीनुसार, प्रस्तावित आयपीओमध्ये 800 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 65,475,432 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) चा समावेश आहे. या ओएफएसमध्ये इन्व्हेस्टर प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर (गुंतवणूकदार प्रवर्तक विक्री भागधारक)एजीएस टीएस II होल्डिंग्ज पीटीई. लिमिटेड (यांची अंतिम मालकी आणि नियंत्रण हिलहाउस इन्व्हेस्टमेंटच्या फंडांकडे आहे) यांच्याकडून 49,834,140 पर्यंतचे इक्विटी शेअर्स; करण चोप्रा यांच्याकडून 1,311,430 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि कुणाल मेहरा यांच्याकडून 10,074,740 पर्यंतचे इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. (हे दोघे मिळून वैयक्तिक प्रवर्तक विक्री भागधारक आहेत.) कंपनीचे प्रवर्तक करण चोप्रा, कुणाल मेहरा, सरिता बॅनर्जी, केएएम अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एजीएस टीएस II होल्डिंग्ज पीटीई. लिमिटेड आहेत.
उर्वरित ओएफएसमध्ये श्रीनिवास प्रसाद यांच्याकडून 1,967,140 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, नरेंद्र कुमार कामराजू यांच्याकडून 723,910 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, आरएसपी रिअल इस्टेट एलएलपी यांच्याकडून 840,162 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि रामचंद्र वेंकटसुब्बा राव यांच्याकडून 723,910 पर्यंतचे इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. या सर्वांना एकत्रितपणे इतर विक्री समभागधारक म्हटले आहे.
कंपनी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs), फॉर्च्युन 500 कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी त्यांच्या गरजेनुसार तयार केलेल्या, एंटरप्राइझ-ग्रेड मॅनेज्ड वर्कस्पेस सोल्यूशन्स उपलब्ध करून देते. कंपनीच्या एकात्मिक “सिंगल-चेक” मॉडेलअंतर्गत वर्कस्पेसच्या संपूर्ण कार्यकाळात लीजिंग, डिझाइन, फिट आउट, कामकाज, सुविधा व्यवस्थापन आणि अनुपालन या सर्व बाबींचा समावेश केला जातो.
डीआरएचपीमध्ये नमूद केलेल्या सीबीआरई अहवालानुसार, 2017 मध्ये स्थापना झाल्यापासून कंपनीने भारतातील सर्वात मोठ्या मॅनेज्ड वर्कस्पेस ऑपरेटर्सपैकी एक म्हणून स्थान निर्माण केले आहे. 31 मार्च 2026 रोजी कंपनीकडे 9.33 दशलक्ष चौरस फूट लीज्ड क्षेत्रफळ होते. यापैकी 98.01% क्षेत्रफळ आठ टियर-1 शहरांमधील 33 प्रमुख कार्यालयीन क्लस्टर्समध्ये असलेल्या ग्रेड A मालमत्तांमध्ये होते. अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की बेंचमार्क्ड ऑपरेटर्समध्ये मॅच्युअर फॅसिलिटीज/मॅच्युअर सेंटर्सच्या बाबतीत कंपनीचा ऑक्युपन्सी रेट सर्वाधिक 92.64% होता.
डीआरएचपीनुसार, कंपनीने आर्थिक वर्ष 2026 मध्ये 24,776.83 दशलक्ष रु. इतका नॉर्मलाइज्ड महसूल नोंदवला. मागील वर्षाच्या तुलनेत यात 56.42% ने वाढ झाली आहे. याच कालावधीत कंपनीने 4,537.99 दशलक्ष रु. इतका नॉर्मलाइज्ड EBITDA नोंदवला. यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 124.36% वाढ झाली. अपवादात्मक बाबी आणि करापूर्वीचा नफा 1,347.12 दशलक्ष रु. इतका होता.
Top of Form
अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वी आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत, तर केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत.
