fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे पुणे जिल्ह्यातील मुलींना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे निमंत्रण

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती अर्ज  संकेतस्थळावर उपलब्ध

पुणे – लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ)   शैक्षणिकदृष्ट्या हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलींना  शिष्यवृत्तीद्वारे नेहमिच मदत करते.  शिक्षण आणि सबलीकरण करण्याच्या परंपरेची   २५ गौरवशाली वर्ष २०२० पुर्ण झाली आहेत.ही शिष्यवृत्ती निशुल्क आहे, ज्यात  मुलींच्या संपुर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमाचा खर्च उचलला जातो.गेल्या २५ वर्षांमध्ये एलपीएफने ९३०० हुन अधिक मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांचे जीवन बदलले आहे. लीला पुनावाला (पद्मश्री प्राप्तकर्ता १९९८, अध्यक्षा-एलपीएफ) आणि  फिरोज पुनावाला (संस्थापक विश्वस्त, एलपीएफ) यांनी सुरू केलेल्या, एलपीएफच्या अनेक यशोगाथा आहेत .

पुणे जिल्ह्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये अभियांत्रिकी, विज्ञान आणि फार्मसी  या विषयांत पदव्युत्तर – याचबरोबर अभियांत्रिकी, विज्ञान , फार्मसी आणि नर्सींग  या विषयांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यास इच्छुक  असलेल्या उमेदवारांकडून एलपीएफ ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज मागवत आहे.

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती अर्ज फॉर्म     https: //www.lpfscholarship.com  या संकेतस्थळावर १ सप्टेंबर २०२०पासून उपलब्ध आहेत.

अधिक तपशील जाणून घेण्यासाठी एलपीएफ वेबसाइट  https://www.lilapoonawallafoundation.com  वर भेट द्या.

कृपया लक्षात घ्या की प्रथम येणार्‍या प्रथम सेवा आधारावर डाउनलोडसाठी मर्यादित फॉर्म उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading