केंद्राकडे व्हेंटिलेटरची मागणी – आनंद भरोसे
परभणी दि.7 – जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालेले कोरोनाचे संक्रमण, वाढता मृत्यूदर, जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु असलेला सावळा गोंधळ सुरु असल्याने रुग्णांची होत असलेली गैरसोय, समन्वय व नियोजनाचा अभाव दिसत असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसत असल्याने परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन परभणी जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील माहिती दिली तसेच आनंद भरोसे यांनी श फडणवीस यांना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना शिफारस पत्र पाठवण्याचे निवेदन दिले. फडणवीस यांच्या कार्यालयामार्फत केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांना ईमेलद्वारे त्वरित शिफारस पत्र पाठवले लवकरच केंद्राकडून सकारत्मक प्रतिसाद मिळेल अशी माहिती आनंद भरोसे यांनी दिली.
सुरुवातीला परभणी जिल्हा हा कोरोना विषाणूच्या संकटापासून खुप दूर होता. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांनी चांगल्या प्रकारचे नियोजन केले परंतु नंतर पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्या नंतर बाधित रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे. आता मात्र कोरोनाचे संक्रमण इतके वाढले आहे कि रोज ५० ते ६० कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत आणि मृत्यूदर पण वाढत चाढलेला आहे. जिल्ह्यात संक्रमण खूप झपाट्याने वाढत असताना पाहिजे तशी कुठलीच उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येत आहे.राज्य सरकारकडून जिल्ह्यात वाढत असलेल्या संक्रमणास थांबवण्याच्या उपाययोजना होताना दिसत नाहीत या सर्व पार्श्वभूमीवर परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्राकडे व्हेंटिलेटरची व जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या असलेल्या सुविधेसाठी निधीची मागणी केली आहे.
