Air india च्या विमानाचे केरळमध्ये क्रॅश लँडिंग, 14 प्रवासी ठार, 15 गंभीर, 123 जखमी
कोझीकोड, दि. 7– केरळमधील एअर इंडियाचं विमान लँडिंग करताना अपघात घडला आहे. लँडींग होत असताना धावपट्टीवरून विमान घसरलं. या विमानात 191 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. दुबईहून हे विमान कालिकत येथे आलं होतं. विमानातील प्रवाशांना वाचण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ही घटना पावणेआठच्या दरम्यान घडली.

केरळमधील कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर हे विमान लँडिंग करत होतं. लँडिंगवेळी विमान धापट्टीवरून घसरलं. धापवपट्टीवरून घसरत हे विमान दरीत कोसळलं. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले. यात विमानाच्या पायलटसह 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 15 प्रवाश्याची प्रकृती गंभीर असून 123 जखमी प्रवासी जखमी आहेत.
