fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENT

एमएक्स प्लॅयर घेऊन आलंय भावनिक गुंत्याचा ‘मसुटा’

लॉकडाऊनच्या काळात मराठी मनोरंजनाची एक वेगळीच पर्वणी एम एक्स प्लेयरने मराठी प्रेक्षकांना दिली आहे. समाजाला आरसा दाखवणारा आणि भावनिक नात्याची गोष्ट सांगणारा ‘मसुटा’ हा चित्रपट एम एक्स प्लेयर आता प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. विविधांगी शैली असलेल्या अनेक कलाकृती मराठी प्रेक्षकांला एम एक्स प्लेयरने दिल्या असून आता ‘मसुटा’ हा नवीन सामजिक चित्रपट सुद्धा एम एक्स प्लेयरने प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केला आहे.

आपला देश हा विविधतेने नटलेला तसेच सामाजिक बांधिलकी जपणारा असला तरीही काही खेड्यापाड्यात अनिष्ट रूढी आणि प्रथा तसेच जातीभेद हा आज सुद्धा पाळला जातो. यावरच आधारित तसेच शिक्षणासाठी झटणाऱ्या एका कुटुंबाची गोष्ट ‘मसुटा’ आपल्या समोर आणत आहे. आपल्या समाजात मृत्यू नंतर अंत्यविधी करणं हे फारच गरजेचं समजलं जातं असलं तरी ते अंत्यविधी करणारा समाज मात्र अनेकांना गरजेचा वाटत नाही. गावाखेड्यांमधील शाळा आजही असे काम करणाऱ्या कुटुंबातील मुलांना तेथे शिक्षण घेऊ देत नाही. या कुटुंबातील मुलींसोबत कोणीही गावातील मंडळी लग्न करत नाही आजही ही कुटुंबे कोणत्याही सरकारी लाभ, योजना व सुविधांसाठी अपात्र मानली जातात. परिस्थिती आणि गाव त्यांच्या विरोधात जाऊन आपल्या मुलाला शिकवण्याची इच्छा असलेल्या बापाची आणि त्याच्या कुटुंबाच्या व्यथेची गोष्ट ‘मसुटा’ मधून आपल्या समोर येणार आहे. मसुटा चे दिग्दर्शन अजित देवळे यांनी केलं असून नागेश भोसले, हृदयनाथ राणे, अनंत जोग, अर्चना महादेव, रियाज मुलानी, कांचन पगारे, वैशाली केंडळे, यश मोरे हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading