Friday, August 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जैतापूरसाठी फ्रेंच तंत्रज्ञान महाग; पेपरफुटी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक – डॉ. अनिल काकोडकर

चिपळूण  : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत नसला, तरी प्रकल्पासाठी प्रस्तावित फ्रेंच तंत्रज्ञानाची किंमत खूपच जास्त असल्याने त्यातून निर्माण होणारी वीज सर्वसामान्यांना परवडणारी असणे महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
डेरवण येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पासह शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या पेपरफुटीच्या घटनांवरही भाष्य केले. अणुऊर्जा ही स्वच्छ ऊर्जा असल्याने जैतापूर प्रकल्पामुळे प्रदूषणाचा धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ऊर्जा निर्मितीच्या कोणत्याही प्रकल्पात विजेचा दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात राहणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पेपरफुटीच्या घटनांबाबत बोलताना डॉ. काकोडकर म्हणाले की, शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि आकलन क्षमता वाढवणे हा असला पाहिजे, केवळ व्यवसाय करणे नव्हे. परीक्षा ही विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी असते. ज्या ठिकाणी शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर चांगले आहे, तेथे मूल्यमापनाचे अधिकार प्राध्यापकांकडेच असावेत, असे त्यांनी नमूद केले.
पेपरफुटी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रभावी ठरू शकते. आज आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध असूनही त्याचा परीक्षा प्रक्रियेत पुरेशा प्रमाणात वापर होत नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading