Monday, May 25, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

केरळ लघुपट महोत्सवात मराठी लघुपट अनौरस ठरला सर्वोत्कृष्ट

पुणे: नवोदित कलाकारांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सहाव्या केरळ लघुपट महोत्सवात अनौरस हा मराठी लघुपट सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. अत्तर या लघुपटासाठी रामकुमार शेडगे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला, तर अ नेम या लघुपटासाठी अनुप जॉर्ज यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला.
प्रसिद्ध अभिनेते नितीन कार्यकर आणि ज्येष्ठ लेखक पत्रकार सुभाषचंद्र जाधव यांच्या हस्ते महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. भारतासह देश-विदेशातील 50 हून अधिक लघुपट महोत्सवामध्ये दाखविण्यात आले. त्यापैकी सुमारे 30 लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात आली.
निबुला हा लघुपट सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट ठरला, तर कुछ रिश्ते कुछ यादे या लघुपटासाठी शिवदर्शन साबळे यांना सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले आणि शाडो या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट भारतीय पटकथेचा पारितोषिक मिळाले. रिबेल या लघुपटासाठी यश गायकवाड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले तर प्रिया प्रमिता पॉल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. अत्तर या लघुपाटासाठी मीरा शेडगे यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार हे पारितोषिक मिळाले. हर्षल अल्पे दिग्दर्शित समर्पित या लघुपटाला सर्वोत्कृष्ट नेरेटिव्ह लघुपाटाचे पारितोषिक मिळाले तर हर्षल अल्पे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. अ लॉन्ग नाईट या लघुपटाला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लघुपट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले , तर कलोत्रा या लघुपटाला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लघुपट म्हणून गौरविण्यात आले तसेच रिबेल या लघुपटासाठी योगेश कांबळे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचे पारितोषिक मिळाले तर उप्या या लघुपट्याला सर्वोत्कृष्ट चिल्ड्रन्स फिल्म हा बहुमान मिळाला. आर्यन बेडेकर यांच्या सायबर सापळा या लघुपट्याला सर्वोत्कृष्ट मोबाईल लघुपट म्हणून गौरविण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading