Sunday, May 3, 2026
Latest NewsPUNE

उद्योजकता विकासाद्वारे महिलांनी आत्मनिर्भर व्हावे – स्मिता धुमाळ

जागतिक  महिला दिनानिमित्ताने यशस्वी संस्थेच्यावतीने उद्योजिका-व्यावसायिक महिलांचा  सत्कार सोहळा संपन्न

पुणे  : कौशल्य  विकास प्रशिक्षण केल्यानंतर उद्योजकता  विकासाद्वारे महिलांनी आत्मनिर्भर व्हावे,असे  मत यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्सच्या संचालिका स्मिता  धुमाळ  यांनी व्यक्त केले.

त्या आज पुणे येथील यशस्वी संस्थेच्या मुख्यालयात जागतिक  महिला दिनानिमित्ताने आयोजित उद्योजिका-व्यावसायिक महिलांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, महिलांनी उद्योग-व्यवसाय क्षेत्रात  कार्यरत असताना कुटुंबातील सदस्यांना देखील सामावून घ्यावे, जेणेकरून वर्क लाईफ बॅलन्स सुरळीत  राहून आपण व्यवसायांच्या गुणवत्तेवर व प्रगती  करण्याकडे आपल्याला  लक्ष  देता येईल.यावेळी स्मिता धुमाळ यांनी त्यांच्या करिअरच्या वाटचालीचा  प्रवास सांगत विद्यार्थिनींना  मार्गदर्शन  केले.

याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थिनींनी त्यांच्या उद्योजकतेच्या प्रवासाबद्दल मनोगते  विशद

 केली.याप्रसंगी कौशल्य  विकास प्रशिक्षण  पूर्ण करून उद्योजक- व्यावसायिक प्रवास सुरु केलेल्या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र  प्रदान करून  गौरविण्यात  आले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमृता तेंडुलकर यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेच्या  प्रशिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित  होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading