Sunday, April 5, 2026
ENTERTAINMENTLatest News

“सनई चौघडे” मधील रुबाबदार जय खानोलकर – शिस्त, स्वॅग आणि भावनांचा अनोखा संगम

झी मराठीची नवी मालिका ‘सनई चौघडे” मध्ये अभिनेता राज हंचनाळे एका दमदार आणि स्टायलिश नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘जय खानोलकर’ ही त्याची व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक आहे. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, सहकलाकार आणि त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल राजने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

“माझ्या व्यक्तिरेखेचे नाव जय खानोलकर आहे. तो खूप प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि थोडासा अॅटिट्युड असलेला आहे. वरूनपाहता तो थोडा रागीट वाटू शकतो, पण मनाने खूप हळवा आहे. त्याच्या आयुष्यात फक्त तीन स्त्रिया महत्त्वाच्या आहेत – त्याची आजी, आई आणि बहीण. त्याचं स्पष्ट मत आहे की इतर गोष्टींमध्ये न अडकता कामावर लक्ष केंद्रित करावं. त्याने स्वतःच्या मेहनतीने शून्यातून स्वतःचं विश्व उभं केलं आहे, त्यामुळे त्याला त्याचा अभिमान आहे, पण गर्व नाही. तो सरळ, स्पष्टवक्ता आणि कामावर लक्ष देणारा आहे. त्याच्या ऑफिस मध्ये महिला कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी नाही.  त्याच्या आयुष्यात अनेक गुपितं आहेत, जी मालिकेच्या प्रवासात उलगडत जातील. या भूमिकेसाठी माझी  निवड झाली म्हणजे मला प्रॉडक्शन हाऊसमधून ऑडिशनसाठी कॉल आला. हे ऐकून मला खूप उत्सुकता वाटली. मला तिने सांगितलं की राजू सावंत डीरेक्टर आणि प्रोड्युसर आहे आणि ही आमच्या प्रोडक्शन ची पहिली सिरीयल आहे आणि प्लस ती झी मराठीवर आहे, सो हे कॉम्बिनेशन… एकदम भन्नाट वाटलं. मी पहिलं ऑडिशन घरातून पाठवलं आणि ते सगळ्यांना आवडलं. त्यानंतर मला सेटवर तीन-चार राऊंडसाठी बोलावण्यात आलं सह कलाकारानं सोबत ऑडिशनसाठी. माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता, कारण या आधी साधारण एक-दोन ऑडिशनमध्ये निवड होत असे. या भूमिकेसाठी मात्र चार-पाच ऑडिशन झाले. तेव्हा थोडे प्रश्न मनात आले, पण आता मागे वळून पाहताना वाटतं की योग्य कलाकार निवडण्यासाठी त्यांनी काटेकोर प्रयत्न केले. त्या प्रक्रियेचा भाग होण्याचा मला आनंद आहे. कोणतीही भूमिका करताना शारीरिक आणि मानसिक तयारी महत्त्वाची असते. जय हा एक प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेला मुख्य नायक आहे. त्याची बॉडी लँग्वेज, स्वॅग, अॅटिट्युड आणि स्टाईल यावर मी विशेष काम करत आहे. तो मेहनतीने उभं केलेलं साम्राज्य सांभाळणारा असल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वात रुबाब आणि अधिकार दिसणं गरजेचं आहे. यासाठी मी दिग्दर्शकांसोबत चर्चा करून भूमिका अधिक चांगल्या प्रकारे विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. तो जरी कठोर वाटत असला तरी मनाने प्रेमळ आहे, हे दाखवणंही महत्त्वाचं आहे. माझ्या आधीच्या भूमिका थोड्या भावनिक आणि गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यात ग्रामीण बोली आणि साधी बॉडी लँग्वेज होती. जय खानोलकर मात्र पूर्णपणे वेगळा आहे. त्याची चाल, बोलणं, उभं राहणं सगळंच वेगळं आहे. प्रेक्षकांना माझ्यातला हा बदल नक्कीच आवडेल, असं मला वाटतं.

प्रोमोला खूप छान प्रतिसाद मिळाला. कास्ट, संकल्पना आणि जयची एंट्री प्रेक्षकांना आवडली आहे. “स्वामींची इच्छा” या संवादासाठी मला अनेक मेसेज आले. रिक्षावर लिहिलेलं “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्यही लोकांना खूप भावलं. प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांच्या अपेक्षांना साजेसे असे काम आम्ही करू.

जय खानोलकरच्या रूपात राज हंचनाळे एक नवा, स्टायलिश आणि भावनिक नायक प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. मेहनत, शिस्त आणि भावनांचा संगम असलेली ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल. तेव्हा बघायला विसरू नका “सनई चौघडे” १६ मार्च पासून  दररोज रात्री ८.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading