Tuesday, April 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

स्टारडमचा दिमाख आणि स्वाभिमानाची साद: नवी मालिका ‘मोहिनी’

ग्लॅमर, चाहत्यांची वेडी गर्दी आणि स्टारडमचा दिमाख… मनोरंजन सृष्टीच्या झगमगाटात उलगडणारी ‘मोहिनी’ ही एक धगधगती प्रेमकहाणी लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. फिल्मी दुनियेच्या सेटवर जन्मलेली एक सामान्य मुलगी आणि त्याच सेटवर राज्य करणारा एक सुपरस्टार! बॉलिवूडची चकाकी आणि त्यामागील त्याग, संघर्ष व भावनिक घालमेल यांची वास्तवदर्शी बाजू ही मालिका प्रभावीपणे मांडणार आहे. नशिबाने लिहिलेला मोहिनीचा प्रवास आणि अहंकाराने उभं केलेलं सुपरस्टारचं विश्व जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा एका वेगळ्याच नात्याचा जन्म होतो. नियतीपुढे आजवर कोणाचे चालले आहे का? दोन पूर्णपणे भिन्न स्वभावाचे मोहिनी आणि RK एकमेकांसमोर आल्यावर नक्की काय घडणार? पडद्यामागच्या आणि पडद्यावरच्या माणसांचे भावविश्व रंगावणाऱ्या या मालिकेत ‘मोहिनी’ ही भूमिका अनघा ठाकूर साकारत आहे, तर समीर परांजपे ‘RK’ च्या भूमिकेत दिसणार आहे.

पहिल्याच प्रोमोमध्ये सेटवरील एक वेगळंच चित्र पाहायला मिळतं. शूटिंग थांबलेलं आहे… सगळे निवांत, कुणी लाईटला टेकून बसलेले, कुणी गप्पांमध्ये रंगलेले, तर डिरेक्टर खुर्चीत डोळे मिटून शांत बसलेला. इतक्यात स्टुडिओचा दरवाजा उघडतो… RK ची एन्ट्री होताच वातावरण क्षणार्धात बदलतं! त्याचा पाय सेटवर पडताच सगळे लगबगीने उभे राहतात, डिरेक्टर उत्साहात “Let’s Roll!” म्हणतो, लाईट्स ऑन होतात आणि हातात कॉफी मग घेत RK चा रुबाबदार अंदाज समोर येतो. “मेकअप!” असा डिरेक्टरचा आवाज घुमताच मेकअप बॅग घेऊन धावत येणारी मोहिनी आणि पुढे चालत येणाऱ्या RK ची धडक होते. मेकअपचं सगळं सामान हवेत उडतं, खाली पडतं, विखुरतं… त्या सामानावर पाय देत “Make-up चं तर सामान आहे फक्त…” असं blunt उत्तर देणाऱ्या RK ला मोहिनी ठामपणे म्हणते, “सामान मेकअपचंच आहे… पण ‘फक्त’ नाही… हेच सामान माणसाला कलाकार, कलाकाराला STAR आणि STAR ला SUPERSTAR बनवतं. अहंकार असणाऱ्याला याचं भान नसतं, पण जाणते कलाकार मात्र याला मान देतात.” सेटवर शांतता पसरते. संतापलेल्या RK कडून “हे तू RK ला सांगणार? … PACKUP!” अशी घोषणा होते आणि तो निघून जातो.

जेव्हा सेटवर सुरू झालेली कथा… उतरते खऱ्या आयुष्याच्या पडद्यावर तेव्हा…? सुपरस्टारचा अहंकार जिंकणार की मेकअप आर्टिस्ट मोहिनीचा स्वाभिमान? प्रकाशझोतात नसली तरी स्वतःच्या कष्टाने प्रकाश निर्माण करणारी मोहिनी आणि अहंकाराची ढाल वापरणारा RK… हे दोन विरुद्ध ध्रुव एकत्र आल्यावर काय घडेल हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा नवी मालिका ‘मोहिनी’, लवकरच, फक्त कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading