सीएनएच इंडियातर्फे जागतिक दर्जाच्या पिक सुविधांसह यांत्रिकीकरण चळवळीचे नेतृत्व
पुणे : कृषी आणि बांधकाम उपकरण क्षेत्रातील जागतिक अग्रणी सीएनएचतर्फे पुण्यातील कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रात तयार होणाऱ्या मेड इन पुणे अशा प्रगत शेती यांत्रिकीकरण उत्पादनांचा उत्सव साजरा करण्यात आला. पुणे प्रकल्पात सीएनएचचे मजबूत संशोधन व विकास (R&D), अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमता सुविधा केंद्र आहे. तिथे देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठांसाठी भारतात जागतिक दर्जाच्या कापणी आणि पिक उपाय सुविधा उपकरणांचे डिझाइन, विकास आणि निर्मिती केली जाते.
280,000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या प्रकल्पात कॉम्बाइन हार्वेस्टर्स, ऊस हार्वेस्टर्स, स्मॉल स्क्वेअर बेलर्स, ट्रॅक्टर्स, हेडर्स, कॅब्स आणि इम्प्लिमेंट्सची निर्मिती केली जाते. प्रगत फॅब्रिकेशन, स्वयंचलित पेंट सिस्टीम्स, संरचित असेंब्ली लाईन्स आणि कठोर चाचणी प्रोटोकॉल्सने सुसज्ज असलेला हा प्रकल्प देशभरातील विविध पिकांमध्ये यांत्रिकीकरणाला पाठबळ देतो तसेच आपल्या उत्पादनाचा काही भाग परदेशात निर्यातही करतो.
सीएनएच इंडिया रीजनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नरिंदर मित्तल म्हणाले, “सीएनएच पुणे प्रकल्प हा भारतातील आमच्या उत्पादन पायाभूत संरचनेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असून देशात यांत्रिकीकरण चळवळीचे नेतृत्व करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. भारत विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, कृषी यांत्रिकीकरण उत्पादकता, कार्यक्षमता आणि शाश्वतता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. ऊस हार्वेस्टर्स, कॉम्बाइन हार्वेस्टर्स आणि बेलर्समधील आमचे तांत्रिक नेतृत्व तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत, इंधन-कार्यक्षम, विश्वासार्ह आणि भारतीय माती व शेती परिस्थितीसाठी विशेष अभियांत्रिकीद्वारे विकसित केलेल्या यंत्रांद्वारे सिद्ध होते. भारतीय शेतकऱ्यांसाठी या उपायसुविधांचे डिझाईन आणि निर्मिती करताना आम्हाला अभिमान वाटतो.”
2023 मध्ये, सीएनएचने या प्रकल्पातून भारतातील पहिले TREM-V एमिशन स्टेज अनुरूप ऊस कापणी यंत्र सादर केले. भारतात ऊस हार्वेस्टर आणि स्मॉल स्क्वेअर बेलर या दोन्ही विभागांमध्ये सीएनएच कडे 50% पेक्षा अधिक बाजारपेठीय हिस्सा आहे आणि कॅब कॉम्बाइन हार्वेस्टर विभागात कंपनी बाजारपेठेतील अग्रणी आहे.
प्रगत यंत्रसामग्रीपलीकडे, कंपनी प्रत्यक्षातील शेतावरील कौशल्य आणि क्षमता विकासावर भर देत असून भारतीय कृषी परिवर्तनासाठी सर्वसमावेशक पूर्णत: बदल करणारा दृष्टिकोन राबवत आहे. युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, ड्रोन आणि डिजिटल तंत्रज्ञान वापरासह कृषी विस्तार शिक्षण, शाश्वत ऊस लागवड आणि पिक कापणीनंतरचा राहिलेल्या भागाचा व्यवस्थापन कार्यक्रम सध्या महाराष्ट्र राज्यात राबवले जात आहेत. पुणे प्रकल्पाला शाश्वतता आणि सुरक्षा पद्धतींसाठीही मान्यता मिळाली आहे. तो IGBC (इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल) प्रमाणित असून 2022 आणि 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल औद्योगिक सुरक्षा पुरस्कार मिळाले आहेत आणि कंपनीच्या 2030 शाश्वतता रोडमॅपनुसार ऊर्जा आणि जलसंवर्धन पद्धतींचे पालन येथे केले जाते. सामाजिक उपक्रमांचा भाग म्हणून जवळील गावांमध्ये शाळा पायाभूत सुविधा पाठबळ प्रकल्प आणि फिरते आरोग्यसेवा उपक्रम राबवले जातात.
ऊस कापणीत यांत्रिकीकरणाची पातळी अजूनही 5% पेक्षा कमी, धान्य कापणीत 30% पेक्षा कमी आणि कापणीच्या नंतर शेतात राहिलेल्या वनस्पतींचे देठ, पाने, मुळे असे भाग यांच्या व्यवस्थापनात केवळ 2% असल्याने भारतात वाढीची संधी लक्षणीय आहे. पुणे प्रकल्प या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी असून येथे शेतकरी, कृषी-उद्योजक आणि बायोमास संकलकांना कार्यक्षमतेसह उत्पादकता वाढविण्यास सक्षम करणारी यंत्रे तयार होतात.
