पुण्यात परिवर्तनकारी सत्संग; भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती
पुणे : पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या परिवर्तनकारी सत्संगाला भाविकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. या प्रवचनात त्यांनी भक्ती, नम्रता आणि मानवी जीवनात नातेसंबंध कसे विकसित करावेत याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी व प्रेरणादायी वाणीमुळे उपस्थित भाविक अंतर्मुख झाल्याचे पाहायला मिळाले.
दोन दिवस चाललेल्या या सत्संगासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती लावून गुरुदेवश्रींचे दर्शन व आशीर्वाद घेतले. प्रवचन समाप्तीनंतर भक्तांमध्ये नवचैतन्य व उत्साह निर्माण झाल्याचे वातावरणात जाणवत होते.
श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूर ही संस्था ज्ञान, ध्यान आणि सेवा या त्रिसूत्रीवर कार्यरत असून विविध केंद्रांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे.
