Saturday, April 18, 2026
BusinessLatest News

ओमनीटेक इंजीनीअरिंग लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 25 फेब्रुवारी पासून होणार सुरू

राष्ट्रीय ओमनीटेक इंजीनीअरिंग लिमिटेड (“कंपनी”) ने 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) बुधवार 25 फेब्रुवारी 2026 पासून प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदारांची बोली एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजे मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 ला सुरु होणार आहे. बोली ऑफर  27 फेब्रुवारी 2026 रोजी बंद होईल.

ओमनीटेक इंजीनीअरिंग लिमिटेडचा प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 216 रुपये ते प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 227 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 66 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या 66 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

या ऑफरमध्ये एकूण 4,180.00 दशलक्ष रु. (418 कोटी रु.)पर्यतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि विद्यमान समभागभागधारक उदयकुमार अरुणकुमार पारेख (“प्रवर्तक विक्री समभागभागधारक”) यांच्याकडून 1,650.00 दशलक्ष रु. (165 कोटी रु.) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे.

या ऑफरमध्ये 10.00 दशलक्ष रु. पर्यतच्या 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सचे आरक्षण समाविष्ट आहे (ऑफरनंतरच्या पेडअप इक्विटी शेअर भांडवलाच्या जास्तीत जास्त 5% इतके). हे पात्र कर्मचाऱ्यांनी सदस्यत्वासाठी (कर्मचारी आरक्षण/राखीव भाग) राखीव ठेवलेले आहेत.

कर्मचारी राखीव हिस्स्यामध्ये बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 11 रु. ची सवलत देण्यात येणार आहे.

कंपनी ही ऊर्जा, मोशन कंट्रोल आणि ऑटोमेशन, औद्योगिक उपकरण प्रणाली, मेटल फॉर्मिंग आणि इतर विविध औद्योगिक उपाययोजना अशा उद्योगांमधील जागतिक ग्राहकांना पुरवठा करणाऱ्या उच्च अचूकता अभियांत्रिकी घटक आणि असेंब्लीजच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक आहे. 19 वर्षांच्या अनुभवासह, कंपनी उच्च अभियांत्रिकी केलेले अचूक मशिनिंग केलेले घटक आणि असेंब्लीज तयार करते. हे प्रामुख्याने सुरक्षा विषयक महत्त्वाच्या उपयोजनांमध्ये वापरले जातात. ICRA अहवालानुसार, कामकाजामधील महसूलाच्या दृष्टीने ओळखलेल्या समकक्ष गटामध्ये कंपनी ही भारतातील उच्च अचूकता अभियांत्रिकी घटक आणि असेंब्लीजची सर्वात वेगाने वाढणाऱ्या उत्पादकांपैकी एक आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2024 आणि आर्थिक वर्ष 2025 दरम्यान 92.45% वाढ नोंदवली आहे आणि आर्थिक वर्ष 2023 ते आर्थिक वर्ष 2025 दरम्यान 39.06% CAGR साध्य केला आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत तसेच आर्थिक वर्ष 2025, 2024 आणि 2023 दरम्यान, कंपनीने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, भारत, संयुक्त अरब अमिरात, जर्मनी, बल्गेरिया, स्वीडन, युनायटेड किंगडम, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांसह 24 देशांतील 256 हून अधिक ग्राहकांना सानुकूलित उच्च अचूकता अभियांत्रिकी घटक आणि असेंब्लीजचा पुरवठा केला आहे.

ही ऑफर 1957 च्या SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली  जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% हे 1938 च्या इन्शुरन्स ॲक्ट च्या तरतुदींनुसार इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे नोंदणीकृत जीवन विमा कंपन्यांसाठी आणि 2013 च्या पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ॲक्ट च्या तरतुदींनुसार पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी कडे नोंदणीकृत पेन्शन फंडांसाठी राखीव ठेवण्यात येईल. मात्र त्यासाठी  त्यांच्याकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्स साठीच्या राखीव श्रेणीमध्ये कमी सदस्यता (under-subscription) झाल्यास, तो हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्सना वाटप केला जाऊ शकतो. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स (प्रमुख गुंतवणूकदार भाग वगळून) QIB Portion मध्ये (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी 5 % पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. पुढे, ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Investors” किंवा “NIIs”) (म्हणजे “Non-Institutional Category”) उपलब्ध असेल. त्यापैकी (अ) बिगर संस्थात्मक विभागासाठी असलेल्यापैकी एक तृतीयांश भाग 0.2  दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पेक्षा पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) बिगर संस्थात्मक विभागासाठी असलेल्यापैकी दोन तृतीयांश भाग 1.00  दशलक्ष रु. पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार बिगर संस्थात्मक विभागासाठी असलेल्या या दोनपैकी कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर संस्थात्मक विभागासाठीच्या दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. अर्थात त्यासाठी ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार नेट ऑफरपैकी किमान 35% वाटप रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्स (RIIs) (Retail Category) साठी उपलब्ध असेल. ऑफर प्राईसच्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली प्राप्त झाल्या असतील तर हे लागू होईल.

या ऑफरमध्ये 10.00 दशलक्ष रु. पर्यतच्या 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या [●] पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे आरक्षण समाविष्ट आहे (ऑफरनंतरच्या पेडअप इक्विटी शेअर भांडवलाच्या जास्तीत जास्त 5% इतके). हे पात्र कर्मचाऱ्यांनी सदस्यत्वासाठी (कर्मचारी आरक्षण राखीव भाग) राखीव ठेवलेले आहेत. याव्यतिरिक्त, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर किंमत इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त दराने त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या वैध बोलींच्या अधीन राहून इक्विटी शेअर्स प्रमाणानुसार वाटप केले जातील.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE एकत्रितपणे Stock Exchanges) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading