Saturday, April 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची कार्यकर्त्यांशी भेट व मनुवादी वृत्तीविरोधात लढ्याची प्रतिज्ञा

पुणे — पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यावर प्रथमच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे शहराला भेट दिली. गेल्या आठवड्यात त्यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनाजवळ भाजपच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दगडफेकीसह हिंसक मोर्चा काढला होता. यानंतर केलेल्या या भेटीचे आयोजन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी करण्यात आले होते. या कार्यक्रमात जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस करून त्यांचा सत्कारही प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्वागत आणि सत्कार करत प्रास्ताविक करून केली. त्यानंतर पुणे मनपा गटनेते रामचंद्र ‘चंदूशेठ’ कदम आणि सर्व नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ”मला दुःख होते आहे की, आपला मुख्यमंत्री फक्त राजकीय टिपणी आणि बदलासाठी खोटे बोलत आहे. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आणि इतिहास आपल्याकडे आहे. शिवाजी महाराजांविषयी खोटे आरोप करणारे आम्ही सोडणार नाही. इतिहासात फुटीरवादाचा काही काळाचा भाग आहे, पण उडून गेले ते कावळे आणि उरले ते खरे मावळे आहेत. पुण्यात काँग्रेसचा मेळावा पाहून विरोधपक्षाचे नेते चिंतेत आहेत हे स्पष्ट दिसते. पुण्याच्या पावन भूमीत मनुवादी विचारांचे साधन आज महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात दिसत आहे, पण येणाऱ्या काळात आपण संविधानाचे सोन्याचे नांगर धरून स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करू. मनुवृत्ती गाढवाचा नांगर आहे, तर संविधान सोन्याचा नांगर आहे. पोलिसांनीही हे लक्षात ठेवावे की त्यांचे उद्धार व रक्षण हेच त्यांचे प्रमुख कर्तव्य आहे. नवीन परिवर्तनाची सुरुवात पुण्यातून झाली आहे आणि आम्हाला ते पुढे नेणे आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष प्राची दुधने यांनी केले, तर आभार मानली माजी नगरसेवक अजित दरेकर यांनी.

या कार्यक्रमात पुणे शहरातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading