टायटनतर्फे गुकेश दोम्माराजू यांची ‘टायटन ऑफ द इयर 2026’ म्हणून घोषणा
मुंबई : गेल्या 40 वर्षांपासून टायटनने विचारपूर्वक डिझाइन, तांत्रिक कौशल्य आणि दीर्घकालीन विश्वासाच्या माध्यमातून भारताच्या वेळेशी असलेल्या संबंधाला आकार दिला आहे. भारतीय आत्म्याशी जुळणारा आणि अंमलबजावणीत जागतिक स्तरावर पोहोचलेला असा हा विश्वास यातून प्रतिबिंबित होतो. या तत्त्वज्ञानाचा विस्तार म्हणून टायटन वॉचेसने आज ‘टायटन ऑफ द इयर’ या आपल्या दुसऱ्या आवृत्तीच्या उपक्रमाची घोषणा केली. ज्यांचा प्रवास प्रस्थापित चौकटींना आव्हान देतो, ज्यांचे प्रावीण्य नवीन मापदंड प्रस्थापित करते आणि ज्यांचा प्रभाव भारताची वाढती जागतिक ओळख बळकट करतो अशा प्रतिष्ठित व्यक्तींचा गौरव हा मंच करतो. विंग कमांडर राकेश शर्मा यांना दिलेल्या पहिल्या सन्मानानंतर 2026 च्या सत्रात ग्रँडमास्टर गुकेश दोम्माराजूचा गौरव करण्यात येत आहे. निर्भय रणनीती, शांत अचूकता आणि सर्वोच्च स्तरावरील सातत्यपूर्ण उत्कृष्टतेने परिभाषित झालेल्या त्याच्या प्रवासाची दखल या सन्मानाद्वारे घेतली जात आहे. या गौरवाचे औचित्य साधत, या वैशिष्ट्यांनी प्रेरित लिमिटेड एडिशन मधील एका विशेष घड्याळाचे अनावरण करण्यात आले आहे. ते बुद्धिबळपटावरील कामगिरीला सुबक डिझाइन आणि अचूक कारागिरीत व्यक्त करते.
या डिझाइनमध्ये खेळाच्या मोजक्या रचनेतून प्रेरणा घेत संतुलन आणि संयमाच्या माध्यमातून ‘मास्टर मूव्ह’ ही संकल्पना साकारण्यात आली आहे. मध्यभागी टायगर आय आणि ब्लॅक अॅगेट या रेअर अर्थ म्हणजेच दुर्मिळ खनिज घटकांमध्ये तयार केलेले सूक्ष्म मार्केट्री डायल असून, त्याची भूमिती बुद्धिबळाच्या पटाशी तसेच गुकेशच्या खेळामागील शांत बुद्धिमत्तेशी सुसंगत आहे. सानुकूल निर्देशांक बुद्धिबळातील पदानुक्रम आणि प्रत्येक सोंगटीच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली प्रतिबिंबित करतात. त्यातून त्यांच्या मोजक्या पण ठाम दृष्टिकोनाचे दर्शन डायलच्या मांडणीत होते. घडाळ्यामागील रोटरवर ग्रँडमास्टर नाईटचा आकृतीबंध आणि ‘Youngest World Chess Champion at 18’ अशी कोरलेली अक्षरे असून, जागतिक स्तरावर गुकेश यांच्या विजयाची नोंद घेतली आहे. घड्याळातील प्रकाशमान काटे त्याच्या खेळाला परिभाषित करणाऱ्या एकाग्रता आणि स्थिर चित्त यांसह सहजतेने फिरतात. ग्रँडमास्टर नाईट काउंटरपोईज ही एक खास गोष्ट सुसूत्र उत्कृष्टतेला अधोरेखित करते.
या संपूर्ण रचनेचे संरक्षण सॅफायर क्रिस्टलद्वारे केले असून, रोझ-गोल्ड फिनिश असलेल्या 316 स्टेनलेस स्टील केस आणि बेझेलमध्ये ते बसवण्यात आले आहे. त्यातून या रचनेला निश्चिती आणि स्थैर्य येत आहे. टायटनच्या इन-हाऊस ऑटोमॅटिक मूव्हमेंटवर चालणारी आणि केवळ 500 संख्येतील मर्यादित असलेली ही घड्याळे रोझ गोल्डची सौम्य तेजस्वी झळाळी आणि गडद काळ्या इटालियन लेदर स्ट्रॅपच्या एकत्रीकरणातून व्यक्त होतात. ही जोडणी साधी पण आत्मीय, आधुनिक-समकालीन आणि तरीही दीर्घकाळ टिकणारी आहे.
टायटन कंपनी लिमिटेडच्या वॉचेस डिव्हिजनचे उपाध्यक्ष आणि मुख्य विक्री आणि विपणन अधिकारी राहुल शुक्ला म्हणाले, “आपल्या राष्ट्राची बदलती ओळख, सामायिक आकांक्षा आणि दृढ निर्धार प्रतिबिंबित करत स्थापनेपासूनच टायटन भारताच्या सांस्कृतिक प्रवाहाचा भाग राहिला आहे. ‘टायटन ऑफ द इयर’ हा या परंपरेचा ठोस विस्तार असून वैयक्तिक उत्कृष्टता आणि सामूहिक राष्ट्रीय अभिमान साजरा करतो. या मंचाद्वारे, काळाच्या ओघात भारतीय तेजस्वितेची नोंद करणारी एक कायमस्वरूपी हॉरॉलॉजिकल गॅलरी उभारण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. ज्यांचे योगदान भौगोलिक सीमांच्या पलीकडे विस्तारलेले आहे आणि त्यांनी जागतिक पातळीवर देशाचे स्थान अधिक मजबूत केले आहे अशा व्यक्तींचा गौरव आम्ही करत आहोत. जागतिक दर्जाच्या प्रीमियम वॉचमेकिंगद्वारे ग्राहकांना या संग्रहातील एक जिताजागता अध्याय परिधान करता यावा असा या प्रत्येक निर्मितीचा उद्देश आहे. बुद्धिबळाच्या जगतातील असाधारण कामगिरी आणि प्रेरणादायी प्रवासामुळे गुकेश हा या सन्मानासाठीची स्वाभाविक निवड होता. इतक्या लहान वयातील त्यांची उल्लेखनीय यशस्वी कामगिरी नव्या भारताची ऊर्जा, चिकाटी, महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास अधोरेखित करते.”
ग्रँडमास्टर गुकेश दोम्माराजू आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “टायटन ऑफ द इयर’ म्हणून मिळालेली ओळख माझ्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण क्षण आहे. जागतिक बुद्धिबळ मंचावर भारताचे वाढते स्थान यातून दिसून येते. माझा प्रवास सातत्यपूर्ण तयारी, शिस्त आणि वेळ, संयम व अचूकतेच्या भूमिकेने घडवला गेला आहे. ही मूल्ये या घड्याळामध्ये अत्यंत विचारपूर्वक साकारण्यात आली आहेत. ही ओळख देशभरातील तरुणांना प्रेरणा देईल, त्यांना बांधिलकी आणि विश्वासाच्या जोरावर काय शक्य आहे हे दाखवेल अशी मला आशा आहे. विश्वास, कारागिरी आणि शांतपणे काम करत उत्कृष्टतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या टायटनसारख्या ब्रँडशी माझ्या या प्रवासाच्या टप्प्यावर जोडले जाणे ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान असून मी नेहमीच याकडे कृतज्ञतेने पाहीन.”
गुकेश x ग्रँडमास्टर ही एक अत्यंत मागणी असलेली संग्राह्य वस्तू असून गुकेश याच्याकडून वैयक्तिक संदेश असलेल्या खास डिझाइन केलेल्या पॅकेजिंगमध्ये सादर करण्यात येते. 69,995 रु. किंमतीचा हा लिमिटेड एडिशन उत्कृष्ट नमुना निवडक टायटन वर्ल्ड स्टोअर्स, मोठ्या स्वरूपातील रिटेल स्थळ, प्रीमियम घड्याळ विक्रेत्यांकडे तसेच www.titan.co.in वर ऑनलाइन उपलब्ध आहे.
