गौडीयम आयव्हीएफ अँड वुमेन हेल्थ लिमिटेडची इक्विटी शेअर्ससाठीची प्राथमिक समभाग विक्री 20 फेब्रुवारी पासून
https://www.sarthi.in/wp-content/uploads/2026/02/Gaudium_RHP.pdf
राष्ट्रीय : गौडीयम आयव्हीएफ अँड वुमेन हेल्थ लिमिटेडची (“Gaudium IVF” किंवा “कंपनी”) ने इक्विटी शेअरसाठी शुक्रवार 20 फेब्रुवारी 2026 पासून प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
या ऑफरमध्ये कंपनीकडून एकूण 1,13,92,500 पर्यतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“Fresh Issue”) आणि प्रवर्तक विक्री समभागभागधारक (“Selling Shareholder”) असलेल्या डॉ. मणिका खन्ना यांच्याकडून 94,93,700 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (“Offer for Sale”) यांचा समावेश आहे.
कंपनीने निव्वळ उत्पन्नाचा उपयोग नवीन आयव्हीएफ केंद्रांच्या स्थापनेसाठी भांडवली खर्चाच्या निधीसाठी, कंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/पूर्वपरतफेड करणे आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (“Objects of the Offer”) करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
प्रमुख गुंतवणूकदारांची बोली सुरु आणि बंद होण्याचा दिनांक बुधवार, 18 फेब्रुवारी 2026 आहे. बोली/ऑफर शुक्रवार 20 फेब्रुवारी 2026 रोजी खुली होईल आणि मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 रोजी बंद होईल.
प्रति इक्विटी शेअरसाठी 75 रुपये ते 79 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 189 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 189 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
इक्विटी शेअर्स आरएचपी द्वारे सादर करण्यात येत आहेत.
आरएचपी द्वारे सादर करण्यात येत असलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेडचे मेन बोर्ड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील.
सारथी कॅपिटल ॲडव्हायर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरसाठीचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.
ही ऑफर 1957 च्या SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. वरील कलम (ii) मध्ये नमूद केलेल्या राखीव श्रेणीमध्ये कमी सदस्यता (under-subscription) झाल्यास, तो हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्सना वाटप केला जाऊ शकतो. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स (प्रमुख गुंतवणूकदार भाग वगळून) नेट QIB Portion मध्ये (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी वर नमूद केलेल्यापेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल.
पुढे, ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Investors” किंवा “NIIs”) (म्हणजे “Non-Institutional Category”) उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग 2 लाख रु. पेक्षा जास्त आणि 10 लाख रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 10 लाख रु. पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. ऑफरपैकी किमान 35% वाटप रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्स साठी उपलब्ध असेल. ऑफर प्राईसच्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली प्राप्त झाल्या असतील तर हे लागू होईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक माहितीसाठी पृष्ठ क्र. 379 वरील “ऑफर प्रक्रिया” (Offer Procedure) पाहा.
